Goa School Education
Goa School EducationDainik Gomantak

Goa School : सरकारचे अयोग्य धोरण; छोट्या विद्यार्थ्यांची गैरसोय नको

सरकारी नवीन धोरणानुसार फोंडा तालुक्यातील बहुतांश प्राथमिक शाळांवर संक्रांत येण्याचा धोका आहे. विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे, त्यामुळेच सरकारी धोरणाला आता फोंडा तालुक्यातूनही विरोध व्हायला लागला आहे.

नरेंद्र तारी

फोंडा : सरकारी नवीन धोरणानुसार फोंडा तालुक्यातील बहुतांश प्राथमिक शाळांवर संक्रांत येण्याचा धोका आहे. विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे, त्यामुळेच सरकारी धोरणाला आता फोंडा तालुक्यातूनही विरोध व्हायला लागला आहे.

फोंडा तालुक्यातील फोंडा, शिरोडा, मडकई व प्रियोळ अशा चारही मतदारसंघांतील काही सरकारी प्राथमिक शाळा सरकारच्या छुप्या धोरणाला फटका बसण्याचा आहे. त्यामुळे पालकांनी या प्रकाराला तीव्र विरोध केला आहे. गेली पन्नास वर्षे सुरू असलेल्या बऱ्याच शाळा बंद पडणार असून खरे म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अतिशय गैरसोय होणार आहे.

Goa School Education
Joshua D'Souza : पाच वर्षांत म्हापशाचा करणार कायापालट

सावळा गोंधळ

वास्तविक एखाद्या विद्यालयाच्या जवळ दोन किलोमीटर परिघात दुसऱ्या विद्यालयाला परवाना देणे गैर आहे, मात्र हे सगळे नियम धाब्यावर बसवून खाजगी शाळांना सरकारने प्रोत्साहन दिल्यामुळेच सरकारी शाळांना गळती लागली आहे. शाळा, विद्यालयांना प्रोत्साहन देण्याऐवजी इतरत्र विलिनीकरण करणे हा सगळा सावळा गोंधळ होणार आहे.

गाळवाड्यात पालक संतप्त

फोंडा तालुक्यातील प्रियोळ मतदारसंघातील गाळवाडा सरकारी प्राथमिक शाळा बंद करून या शाळेतील विद्यार्थ्यांना सातोडे - केरी येथील शाळेत हलवण्याचे फर्मान आल्याने गाळवाडा शाळेच्या पालकांनी तीव्र संताप व्यक्त करून शाळा बंद करू नका, अशी जोरदार मागणी केली आहे. गाळवाडा शाळेत आवश्‍यक साधनसुविधा आहेत, शिवाय शिक्षणाचा दर्जाही चांगला आहे, मग शाळा बंद करण्याचे प्रयोजन काय, असा सवाल गाळवाडा शाळेच्या पालकांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com