Inflation: यंदा शैक्षणिक साहित्यालाही महागाईची झळ ! पालकांच्या खिशाला कात्री

वह्यांच्या किमती १० ते २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता
Goa Education
Goa Education Dainik Gomantak

कागदाच्या वाढलेल्या किंमती, महागलेले प्लॅस्टिक आणि स्टेशनरी साहित्याचा तुटवडा यामुळे शैक्षणिक साहित्याच्या किंमती वाढल्या आहेत. वह्यांच्या दरात थेट २० टक्क्यांची वाढ झाली असून, अन्य शैक्षणिक साहित्याचे दरही गतवर्षीच्या तुलनेत यंदा १० ते २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीलाच पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

Goa Education
Ponda News : फोंडा नगरपालिका नूतन मंडळासमोर आव्हानांचा डोंगर

कोरोना काळात शाळा, महाविद्यालये ऑनलाईन सुरू होती. त्यामुळे शैक्षणिक साहित्याच्या विक्रीत काही प्रमाणात घट झाली. परंतु मागील वर्षापासून शाळा पूर्ववत सुरू झाल्याने वह्या, पुस्तके, दप्तर, रेनकोट यांच्या खरेदीसाठी आता पालक स्टेशनरी दुकानात जात आहेत. पंरतु येत्या नव्या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक साहित्याचे वाढलेले दर पाहून पालकांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष पुढील महिन्यात सुरू होईल. यावेळी पाठ्यपुस्तके, वह्या, कंपास तसेच इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात विद्यार्थ्यांसहित पालकांच्या रांगा लागतील. काही महिन्यांपूर्वीच शैक्षणिक साहित्य दरात वाढ झाली असून जी वही ३५ रू. एक मिळत होती, ती ४० रू. झाली आहे. १०५चा कंपास १४० रू. झाला असून येत्या काळात अजूनही दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • 20 % वह्यांच्या किमतीत वाढ

  • 10 % शैक्षणिक साहित्यातही वाढ

गेल्या दोन वर्षात कागदाचे दर वाढले आहेत. त्यामुळे वह्यांच्या किंमतीत थेट २० टक्के वाढ झाली. अन्य शैक्षणिक साहित्याही १० टक्क्यांनी वाढले आहेत. शाळांसोबच शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्येही मोठ्या प्रमाणात स्टेशनरी साहित्य लागत असते वाढत्या मागणीला अनुसरून दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

वाढत्या माहागाईच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक साहित्यही महागल्याने सर्वांचेच आर्थिक गणित बिघडणार आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठविणे सर्वसामान्य पालकांना कठीण होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com