Goa: ‘एकजुटीने झुंज देऊया’ व्‍हायरल

‘एकजुटीने झुंज देऊया’ व्हिडिओतून कोरोनाविषयी संदेश देण्यात आला आहे. (awareness message through song)
Goa: ‘एकजुटीने झुंज देऊया’ व्‍हायरल
Health workers are raising awareness about corona by singing] at GoaManguesh Borkar

फातोर्डा : मडगाव येथील ‘भांगराळे गोंय अस्मिताय’ (Bhangrale Goyem Asmitay) तर्फे कोरोना (Corona) जागृती मोहिमेचा (Awareness compaign) भाग म्हणून या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. पूर्णानंद च्यारी यांनी कोरोनावर लिहिलेल्या गीताचा ‘एकजुटीने झुंज देऊया’ हा व्हिडिओ निर्मित केला असून त्याला उदंड प्रतिसाद लाभत आहे. यामध्‍ये कोरोना काळातील कोविड योद्ध्यांना (Frontline warriors) अभिवादन करण्यात आले असून उद्योगपती (Businessman), कलाकार (Artists), गायक (Singer), समाजसेवक (Social worker), लेखक (Writers) यांच्या माध्यमातून कोरोनाविषयी आवाहन (Appeal about Corona) केले आहे.

Health workers are raising awareness about corona by singing] at Goa
Goa : रॉलन्ड फर्नांडिस यांच्या हस्ते शवागाराचे उद्घाटन

या व्हिडिओचे लोकार्पण १५ जुलै रोजी केले आहे. हिंदी व मराठीतूनही गीताचे बोल आहेत. डॉ. पूर्णानंद च्यारी यांच्या प्रास्ताविकानंतर नाट्यकलाकार राजेश प्रभू यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन अनिश अग्नी यांनी केले. व्हिडिओत उद्योगपती श्रीनिवास धेंपो, सिने कलाकार वर्षा उसगावकर, अशोक फळदेसाई, गायिका हेमा सरदेसाई, सोनिया शिरसाट, सिने निर्माता राजेंद्र तालक यांचा समावेश आहे. व्हिडिओ बनविताना डॉ. शेखर साळकर व त्यांचे कर्मचारी, फातोर्डा पोलिसांचे सहकार्य लाभले. रेनबो सोलर पावर सोल्युशन्सचे या व्हिडिओ निर्मितीसाठी मोलाची मदत मिळाली. डॉ. पुर्णानंद च्यारी यांची ही संकल्पना व गीतरचना आहे. डॉ. पूर्णानंद च्यारी, पंकज नमशीकर, बिंदिया वस्त, गौतमी हेदे बांबोळकर यांनी हे गीत गायिले आहे.

Health workers are raising awareness about corona by singing] at Goa
Goa: अमली पदार्थांच्या विरोधात 'आरजी' ची आक्रमक भूमिका

Related Stories

No stories found.