युतीचा निर्णय पी चिदंबरम अन् दिनेश राव यांच्या हाती

महाराष्ट्रात शिवसेना व कॉंग्रेस यांचे सयुंक्त सरकार सत्तेवर असले तरी गोव्यात शिवसेनेशी कॉंग्रेसने युती करावी की नाही याचा निर्णय कॉंग्रेसचे गोवा मुख्य निवडणूक निरीक्षक व माजी केंद्रिय गृहमंत्री पी चिदंबरम व गोवा प्रभारी दिनेश राव हे घेतील
युतीचा निर्णय पी चिदंबरम अन् दिनेश राव यांच्या हाती
शिवसेना व कॉंग्रेस युतीचा निर्णय पी चिदंबरम अन् दिनेश राव यांच्या हाती Dainik Gomantak

पणजी: महाराष्ट्रात शिवसेना व कॉंग्रेस (Shiv Sena-Congress) यांचे सयुंक्त सरकार सत्तेवर असले तरी गोव्यात शिवसेनेशी कॉंग्रेसने युती करावी की नाही याचा निर्णय (Decision) कॉंग्रेसचे गोवा मुख्य निवडणूक निरीक्षक व माजी केंद्रिय गृहमंत्री पी चिदंबरम (P Chidambaram) व गोवा प्रभारी दिनेश राव (Dinesh Rao) हे घेतील. अशी माहिती गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष (Goa Pradesh Congress President) गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी दिली आहे. आज पणजी येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांनी चोडणकर यांना येत्या निवडणुकीसाठी शिवसेना व कॉंग्रेसची महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात युती होणार का? असा प्रश्‍न विचारला असता चोडणकर यांनी वरील माहिती दिली.

शिवसेना व कॉंग्रेस युतीचा निर्णय पी चिदंबरम अन् दिनेश राव यांच्या हाती
Goa: कोकणी भाषा मंडळाचा 59वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

मोदी व शहा यांनीच आप व तृणमुलला गोव्यात पाठवलीय

गोव्यात कॉंग्रेसची मते कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनीच आम आदमी पक्ष व तृणमूल कॉंग्रेस पक्षाला गोव्यात पाठवल्याचा दावा यावेळी गिरीश चोडणकर यांनी केली.

मुख्यमंत्र्यानी उत्तर द्यावे

सभापती राजेश पाणेकर यांचा पुत्र जीपीएससी परिक्षेत १४ व्या स्थानावरुन पहिल्या स्थानावर कसा आला. याचे उत्तर मुख्यमंत्र्याकडे काल आम्ही मागितले होते मात्र त्यांनी ते अद्याप दिलेले नाही. लोकांना विशेषता युवांना हे उत्तर हवे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यानी उत्तर द्यावे. असी मागणी चोडणकर यांनी यावेळी केली. गोवा सरकारने वीज खात्यात घेतलेल्या ३२ डेटा ऑपरेटर्सची नोकरी सर्वोच्य व उच्च न्यायालयाच्या निविड्यानुसार गेली आहे. मग या लोकांचे सरकार काय करणार याचेही स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यानी द्यावे. असी मागणी यावेळी चोडणकर यांनी केली.

Related Stories

No stories found.