Goa Election 2022: सर्वाधिक मतदानाचा फायदा साखळीत भाजपलाच होणार

प्रदेशाध्यक्ष तानावडे: भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापणार
Sadanand Sheth Tanawade
Sadanand Sheth TanawadeDainik Gomantak

पणजी: विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान साखळी मतदारसंघात झाले आहे, त्याचा फायदा भाजपलाच झाला आहे. मतदारांनी भाजपला कौल दिला असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी करत 22 मध्ये 22 अधिक जागा मिळवून भाजप तिसऱ्यांदा गोव्यात सत्ता स्थापन करणार असल्याच्या वक्तव्याबाबत आताही ठाम आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Sadanand Sheth Tanawade
Goa Assembly Election: बाबूश-उत्पलमध्ये ‘कांटे की टक्कर’

साखळीमध्ये 89.64 टक्के मतदान झाले आहे. प्रत्येकवेळी या मतदारसंघात सर्वाधिक मतदान होते. पक्षाचे कार्यकर्ते मतदारसंघामध्ये ज्या तऱ्हेने मतदानापर्यंत पोहचून त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याची जागृती करतात त्यावर मतांची टक्केवारी अवलंबून असते. या मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांची भक्कम फळी आहे. साखळी मतदारसंघातील उमेदवार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सुमारे 6 हजार मतांच्या फरकाने विजयी होतील. गेल्या काही निवडणुका भाजपने स्वबळावर लढवत जिंकल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूकही स्वबळावर लढविली असल्याने बहुमत मिळवून जिंकणार हे निश्‍चित असल्याचे तानावडे म्हणाले.

यापूर्वी झालेल्या लोकसभा, पालिका, जिल्हा पंचायत तसेच विधानसभा पोटनिवडणूक या भाजपने स्वबळावर लढवल्या आहेत. त्यात बऱ्यापैकी यश मिळाल्याने आमचा विश्‍वास वाढला. त्यामुळे यावेळी पहिल्यांदाच 40 ही मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. दक्षिणेतील 3-4 मतदारसंघात पक्षाचे अस्तित्व कमी आहे माहीत असूनही उमेदवार उभे करण्यात आले आहेत. उत्तरगोव्यातील बहुतेक सर्व तालुक्यात भाजप उमेदवारांना लोकांनी कौल दिला असल्याचा दावा तानावडे यांनी केला.

Sadanand Sheth Tanawade
निवडणुकीदरम्यान तब्बल 12.72 कोटींची रोकड आणि मुद्देमाल जप्त: राजेश कुमार

...त्यांचा निर्णय केंद्रीय समितीकडे

मांद्रे व पणजी मतदारसंघातून भाजपला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष उमेदवारी लढविलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार का असा प्रश्‍न तानावडे यांना केला असता ते म्हणाले, मी प्रदेशाध्यक्ष असलो तरी ते माझ्या हातात नाही. केंद्रीय समिती त्यावर निर्णय घेऊ शकते. मात्र, ज्यावेळी पक्षाला गरज होती, तेव्हा त्यांनी पक्षातून फारकत घेतली आहे. परंतु येथील भाजप कार्यकर्ते मात्र पक्षाच्या पाठिशी राहिले त्यांचे आभार मानतो.

निवडणूक आयोगाबद्दल कृतज्ञता

राज्यात कोविड महामारी काळात अधिक लोकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाने घेतलेली मेहनत, गोमंतकीय नागरिक, सुरक्षा आणि पोलिस यंत्रणा, इतर संबंधित सरकारी खाती तसेच विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि सत्ताधारी पक्ष या नात्याने राज्य सरकारने उपसलेले कष्ट याचे फळ आज मिळाले. याची प्रचिती आज गोमंतकीय नागरिकांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या मतदानातून आली, अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट - तानावडे यांनी या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com