Goa Election 2022: सर्वच्या सर्व जागा लढवून जिंकण्याचा तृणमूल काँग्रेसचा निर्धार

तृणमुल कॉंग्रेसचे महासचिव व ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी हे येत्या दहा दिवसात गोव्यात
Goa Election 2022: MP Prasoon Banerjee
Goa Election 2022: MP Prasoon BanerjeeDainik Gomantak

Goa Election 2022: तृणमुल कॉंग्रेसचे (Trinamool Congress) महासचिव व ममता बॅनर्जी यांचे (W Bengal CM Mamata Banerjee) पुतणे अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) हे येत्या दहा दिवसात गोव्यात येणार आहेत. प्रशांत किशोर (Prashant Kishor) उद्या गोव्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या तीन दिवसात आंम्ही गोव्यातील अनेक नेत्यांशी चर्चा केली आहे. आम्ही सदर अहवाल अभिषेक बॅनर्जी यांच्यासमोर ठेवणार असून तेच गोव्यात युती व इतर गोष्टीबाबत घोषणा करणार आहेत. अशी माहिती तृणमुलचे खासदार प्रसून बॅनर्जी (MP Prasoon Banerjee) यांनी आज दिली.

Goa Election 2022: MP Prasoon Banerjee
Goa: स्वातंत्र्यसैनिक डॉ. टी. बी. कुन्हा यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

एका वृत्तवाहिनीशी बोलताना बॅनर्जी यांनी सांगितले की, भाजपचा पराभव करणे हेच आमचे ध्येय आहे. त्यासाठीच आम्ही गोव्यात येत आहोत. सर्वच्या सर्व जागा लढवून जिंकण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. असेही बॅनर्जी म्हणाले. 'मर भी जायेंगे लेकीन भाजप को हरायंगे !' हा आमचा नारा असल्याचे सांगून भाजपने देशात व गोव्यातही निधर्मीपणा संपवल्याचा आरोप बॅनर्जी यांनी यावेळी केला. गोव्यातील लोकांना ममता दिदी गोव्यात हवी आहे. त्या चांगल्या नेत्या असून पंतप्रधान होण्याची त्यांची पात्रता आहे. असेही बॅनर्जी म्हणाले. आपणासह खासदार डेरेक अब्रायन गोव्यात असून गेल्या तीन दिवसात अनेक नेत्यांना आम्ही भेटलो पण त्यांची नावे आपण जाहिर करणार नाही. असे एका प्रश्‍नावर बोलताना बॅनर्जी म्हणाले. लवकरच ममता दिली गोव्यात येणार आहे. आपण एक फुटबॉलपटू आहे. गोव्यातील लोक फुटबॉलप्रेमी आहेत. त्यानुसार आमचे चांगलेच जमेल, असेही बॅनर्जी म्हणाले.

Goa Election 2022: MP Prasoon Banerjee
Goa Politics: पेडणे तालुक्यातील लाखों चौ.मी. जागेची विक्री संशयाच्या घेऱ्यात

कॉंग्रेसकडे नेतृत्व नाही

कॉंग्रेसकडे राज्यातच नव्हे तर देशपातळीवरही नेतृत्व नाही. त्यामुळे या पक्षाची वाताहात होत आहे. विरोधीपक्षाकडे योग्य नेतृत्व नसणे ही चिंतेची बाब असून ममता दिदी पुढील काळात पंतप्रधान होणार आहेत.

- प्रसून बॅनर्जी (खासदार तृणमूल कॉंग्रेस)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com