Goa Election 2022: 'तृणमूल' हीच देशातील खरी काँग्रेस, लुईझिन फालेरो यांचा काँग्रेसवर घणाघात

तृणमूल हीच देशातील खरी काँग्रेस आहे. काँग्रेस पक्षाकडे भारतीय जनता पक्षाशी लढा देण्याची ताकद आता राहिलेली नाही - गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार लुईझीन फालेरो
Goa Election 2022: 'तृणमूल' हीच देशातील खरी काँग्रेस, लुईझिन फालेरो यांचा काँग्रेसवर घणाघात
Former CM Luizinho FalerioDainik Gomantak

Goa Election 2022: तृणमूल हीच देशातील खरी काँग्रेस (TMC) आहे. काँग्रेस पक्षाकडे भारतीय जनता पक्षाशी (BJP) लढा देण्याची ताकद आता राहिलेली नाही. मात्र ते काम तृणमूल काँग्रेस व तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी (TMC Leader Mamata Banerjee) चांगल्या रीतीने करू शकतात . त्यामुळेच आपण तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. अशी प्रतिक्रिया गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार लुईझीन फालेरो (Goa Former CM Luizinho Falerio) यांनी आज व्यक्त केली आहे. आज दुपारी फालेरो हे तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल होत आहेत.

Former CM Luizinho Falerio
Goa Politics: गिरीश चोडणकर आभासी दुनियेत

नावेली येथे आपल्या समर्थकांची एक बैठक त्यांनी आज सकाळी घेतली. त्याळी कॉंग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची विविध कारणे त्यांनी कार्यकर्त्यांसमोर विशद केली. आपण सच्चा कॉंग्रेसमन आहे. भाजपने गोव्यातील जनतेची अहवेलना सुरू केली आहे. त्यामुळे भाजपला रोखणे गरजेचे असून सध्याच्या स्थितीत तृणमूल काँग्रेस हे काम करु शकते. हे मी दोन महिने चिंतन करुन जाणले आहे. असेही फालेरो यांनी सांगितले.

Former CM Luizinho Falerio
Goa Election: शिवसेनेची मोर्चे बांधणी सुरू, 29 रोजी संजय राऊत गोव्यात

तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल मध्ये भाजपचा विजय रथ रोखला. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही धडा शिकवला आहे. आणि अशाच कणखर नेतृत्वाची गोव्याला गरज असल्यामुळेच आपण तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करत असून येत्या काळात गोव्यात भाजपला टक्कर देण्यासाठी तृणमूल काँग्रेस उभी राहणार असल्याचा दावा यावेळी फालेरो यांनी केला. तृणमूल हीच देशातील खरी काँग्रेस असल्याचा पुनुरुच्चार फालेरो यांनी पुन्हा पुन्हा केला.

Related Stories

No stories found.