Goa Election: इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे भाजपला सतावतेय बंडखोरांची भिती

कुरबुरींमुळे वाढली डोकेदुखी, भाजपमध्ये (BJP) उमेदवारी ठरवण्याची एक पद्धत आहे. त्याची सर्वांनाच कल्पना आहे. मंडळ पातळीवरून शिफारस, प्रदेश पातळीवरून शिफारस आणि संसदीय मंडळात निर्णय, असा तो टप्पा आहे.
Goa Election: इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे भाजपला सतावतेय बंडखोरांची भिती
भाजपमध्ये अनेक उमेदवार होण्याच्या पात्रतेचे आहेत. हे चांगले लक्षण असले तरी त्यापैकी काहीजण बंड करू शकतात. Dainik Gomantak

पणजी: कॉंग्रेसने (Congress) एकीकडे संघटनात्मक रचनेला जोर लावला असतानाच भाजपच्या (BJP) गोटात मात्र थोडी अस्वस्थता आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) हे आमच्याकडे एकेका मतदारसंघात (Constituency) अनेक उमेदवार होण्याच्या पात्रतेचे आहेत हे चांगले लक्षण आहे असे सांगत असले तरी त्यापैकी काहीजण बंड करू शकतील, असे वाटत असल्याने तो पक्षासाठी चिंतेचा विषय बनला आहे.

भाजपमध्ये अनेक उमेदवार होण्याच्या पात्रतेचे आहेत. हे चांगले लक्षण असले तरी त्यापैकी काहीजण बंड करू शकतात.
Goa: 'मी येथे आघाडीची बोलणी करण्यासाठी आलेलोच नाही': चिदंबरम

मांद्रेत लक्ष्मीकांत पार्सेकर, दयानंद सोपटे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी दौरा केलेल्या मतदारसंघात भाजपच्याच कार्यकर्त्यांत असलेले मतभेद प्रकर्षाने त्यांनाही जाणवले आहेत. तूर्त भाजपचाच उमेदवार विजयी करा, असे सांगत वेळ मारून नेली जात असली तरी कधी तरी उमेदवारी कोणा एकालाच जाहीर करावी लागेल. त्यावेळी उमेदवारीसाठी इच्छुक असलेले दुसरे नेते काय करतील याचा अंदाज घेण्यात येत आहे. त्यापैकी काहीजण बंडाच्या पवित्र्यात असल्याचे जाणवू लागल्याने भाजपने आता चतुर्थीनंतर त्यांचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न करण्याचे ठरवल्याची माहिती मिळाली आहे.

भाजपमध्ये अनेक उमेदवार होण्याच्या पात्रतेचे आहेत. हे चांगले लक्षण असले तरी त्यापैकी काहीजण बंड करू शकतात.
Goa Plan: ...पण गोवा पर्यटकांसाठी तयार आहे का?

कुंभारजुवेत मडकईकर आणि सिद्धेश नाईक

कुंभारजुवे मतदारसंघात पांडुरंग मडकईकर हे विद्यमान आमदार निवडणूक लढवण्याच्या तयारीत असतानाच केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक (Union Minister Shripad Naik) यांचे पुत्र आणि विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक (Siddhesh Naik) यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा दडवून ठेवलेली नाही. दोनच दिवसांपूर्वी तानावडे यांनी त्या मतदारसंघाचा दौरा केला. त्यावेळी ते उमेदवार कोण असेल, हे सांगू शकले नाहीत. उमेदवारी ठरवण्याची प्रक्रिया वेगळी असते. ती वेळ अद्याप आलेली नाही, असे सांगून हा विषय तूर्त लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला जात असला तरी केव्हा तरी तो मुद्दा उफाळून येईल असे वाटत असल्याने तो विषय मिटवण्याचे प्रयत्न सुरू केले जाणार असे दिसते.

भाजपमध्ये उमेदवारी ठरवण्याची एक पद्धत आहे. त्याची सर्वांनाच कल्पना आहे. मंडळ पातळीवरून शिफारस, प्रदेश पातळीवरून शिफारस आणि संसदीय मंडळात निर्णय, असा तो टप्पा आहे. लोकशाहीत आपण इच्छूक आहे, असे म्हणण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यामुळे ती व्यक्ती पक्षविरोधी आहे, असे म्हणता येणार नाही. उमेदवार जाहीर झाले की सर्वजण भाजपला विजयी करण्यासाठी कामाला लागतील, याची खात्री आहे.

- सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com