'काँग्रेसने राज्यात सरकार स्थापन करण्याचं "दिवास्वप्न" थांबवावं'

'आमचा विजय आणि काँग्रेसचा पराभव 10 मार्चला स्पष्ट होईल'
Congress & BJP
Congress & BJPDainik Gomantak

गोवा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याच्या आत्मविश्वासावर काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत, भाजपने पक्षाला राज्यात सरकार स्थापन करण्याचे "दिवास्वप्न" थांबवण्यास सांगितले आहे. राज्य विधानसभेच्या निवडणुकीनंतर सत्तेत परत येऊ पाहत असलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने काँग्रेस नेते दिनेश गुंडू राव यांच्यावर खोचक टीका केली, त्यांनी सोमवारी गोव्यातील भाजपच्या पराभवावर आत्मविश्वास व्यक्त केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी बुधवारी, 16 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या निवेदनात विधानसभेच्या निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेसचा पराभव केला असल्याचे बोलले आहे. "काँग्रेसने (Congress) दिवास्वप्न पाहणे थांबवावे कारण त्यांच्या वक्तव्यातून सत्तेची हाव दिसून येत आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे. प्रचंड मतदानावरून दिसून येते की लोकांनी भाजपला मतदान केले आहे. आमचा विजय आणि काँग्रेसचा पराभव 10 मार्चला स्पष्ट होईल."

Congress & BJP
'मिळणारा प्रतिसाद पाहता मी भारावून गेलो'

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांचाही समाचार घेताना, भाजप (BJP) प्रदेशाध्यक्षांनी असा दावा केला की काँग्रेस नेते 2022 च्या निवडणुकीत (Election) पराभूत झाल्यामुळे घाबरले आहेत. "मतदानाला मिळालेला भरघोस प्रतिसाद म्हणजे गोव्यात भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे", असे ते पुढे म्हणाले.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, 40 विधानसभा जागांसाठी झालेल्या मतदानात गोव्यात 78.94% मतदान झाले. साखळी मतदारसंघात सर्वाधिक 89.61% मतदान झाले, तर सर्वात कमी 70.2% मतदान बाणावली मतदारसंघात झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com