Goa Election : मतविभागणी टाळण्यासाठी धास्तावलेल्या भाजपमध्ये आता युतीची चर्चा

 Goa Election : मतविभागणी टाळण्यासाठी धास्तावलेल्या भाजपमध्ये आता युतीची चर्चा
Goa Election: BJP is now in talks to form a coalition to avoid division of votes

पणजी : कोविड (Corona) काळात भाजपाने (BJP) केलेल्या गैरव्यवस्थापनावर (Mismangement) जनता नाराज आहे. त्याची प्रचिती सरकारलाही आलेली आहे. त्यामुळे धास्तावलेल्या भाजपाने आता विधानसभा निवडणुकीसाठी (Election) युतीवर चर्चा सुरू केली आहे. पुढील निवडणूक जिंकायची असेल आणि स्वबळावर सत्ता स्थापन करायची तर मतविभागणी (Division Of Votes) टाळायला हवी, असे भाजपला वाटते. साखळी मतदारसंघात असलेल्या मगोच्या हक्कांच्या मतांचा विचार प्रामुख्याने यावेळी करण्यात आला आहे. (Goa Election: BJP is now in talks to form a coalition to avoid division of votes)

भाजपने युती न करता निवडणूक लढवली तर किती जागा जिंकल्या जाऊ शकतात आणि युती केल्यास किती जागा जिंकल्या जाऊ शकतात याचा तटस्थ अहवाल तयार केला गेला होता. त्यावर आधारित चर्चा दोन दिवस सुरु होती. बी. एल. संतोष यांच्या दौऱ्यापूर्वी दिल्लीतील नेत्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर तटस्थ अहवाल तयार करवून घेतला होता. त्यात लोकसंख्या, मतदार, मतदारांची भाषक तत्वावरील विभागणी, जात निहाय व धर्मनिहाय समीकरणे, भाजपची बलस्थाने, भाजपच्या विरोधातील मुद्दे, कोणत्या मतदारसंघात भाजपने अधिक लक्ष पुरवणे आवश्यक आहे याची सविस्तर माहिती देण्यात आली होती. 

अमित शहांचे घडामोडींवर लक्ष 
भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांनी गुरुवारी बैठका आटोपल्यानंतर अनौपचारीक चर्चा केली. यात युती हवी आणि झाली तर ती मगोशीच हवी असा मतप्रवाह निर्माण झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राज्यातील घडामोडींवर लक्ष ठेवून असून काल मध्यरात्रीच्या अगोदर त्यांनी संतोष यांच्याकडून राजकीय घडामोडींची पूर्ण माहितीही घेतली.

गावडे जाहीरपणे का सांगतात
प्रियोळ मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिल्यास त्या उमेदवारीवर लढण्यास तयार आहे असे आदिवासी कल्याणमंत्री गोविंद गावडे यांनी जाहीरपणे सांगितल्यानंतर यामागे खरे कारण काय असावे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता  युती करण्याचा विचार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनात रुजत चालला असून या विषयावर आता चर्चा सुरू झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

युती होणार की नाही यावर बोलण्याची ही योग्य वेळ नव्हे. योग्यवेळी योग्य निर्णय पक्षाच्या श्रेष्ठींकडून घेतले जातील. निर्णय झाल्यावर ते सर्वांना समजतील. आता तरी भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. २०२२ मध्ये भाजपचे सरकार येणार आहे असे मी म्हणेन.
- सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com