Goa Election - 10  जागा सोडल्या नाहीत तर एकला चलो रे : चर्चिल आलेमाव

Churchill Alemao
Churchill Alemao

मडगाव -  सर्व निधर्मी पक्षांनी एकत्र येऊन गोव्यात युतीचे सरकार स्थापन (Coalition government in Goa) करावे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचीही आहे, मात्र त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (Nationalist Congress Party) किमान 10 जागा तरी सोडण्याची गरज आहे, असे आमदार चर्चिल आलेमाव (MLA Churchill Alemao) यांनी सांगितले. या 10 जागा सोडल्या नाहीत, तर आम्ही युती न करता स्वतःच्या ताकदीवर चाळीसही मतदारसंघांत राष्ट्रवादीचे उमेदवार (Candidate) उतरवू, असेही त्यांनी नुवे येथे जाहीर केले. (Churchill Alemao: If 10 seats are not left)

नुवे येथे राष्ट्रवादीच्या गट समितीची फ्रेंकी डिमेलो यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, तसेच सरचिटणीस अविनाश भोसले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आलेमाव म्हणाले, सासष्टीत  सगळीकडे उमेदवार उतरविण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे आम्हाला कुणी गृहीत धरू नये. आजच्या घडीला राष्ट्रवादीचे किमान आठ आमदार जिंकवून आणण्याची ताकद आहे. त्यामुळे जे पक्ष आपलेच म्हणणे ऐकून घ्यावे, असा आग्रह धरतात त्यांनी आम्हाला गृहीत धरण्याची चूक करू नये, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com