गोवा नगरपालिका प्रभाग आरक्षणावर निडणूक आयोगाने दिलं न्यायालयाला उत्तर

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

फेररचनेबाबत जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पालिका निवडणूक घेतली जाईल असे स्पष्टीकरण आज राज्य निवडणूक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयासमोर उत्तर देताना केले.

पणजी: पालिका प्रभाग आरक्षणात झालेल्या त्रुटी व भेदभाव दुरुस्त करण्याचा अधिकार सरकारला असून राज्य निवडणूक .त्यात हस्तक्षेप  करू शकत नाही. सरकारने आरक्षण व फेररचनेबाबत जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पालिका निवडणूक घेतली जाईल असे स्पष्टीकरण आज राज्य निवडणूक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयासमोर उत्तर देताना केले.

गोव्यात गेल्या 24 तासांत 57 नवे कोरोना रूग्ण; कर्नाटक, महाराष्ट्रामुळे चिंता वाढली 

काल पालिका प्रभाग आरक्षण वर सुनावणी सुरू असताना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला प्रभाग आरक्षणात भेदभाव झाल्याची कबुली दिली होती त्यावर न्यायालयाने हा भेदभाव सरकारला सुधारण्यास सांगणार का की निवडणूक आहे त्या परिस्थितीत घेतली जाईल त्याबाबत आज स्पष्टीकरण करण्यास सांगितले होते.

गोवा माईल्स विरूद्ध गोव्यातील टॅक्सीचालकांचा वाहतूक संचालनालयाला घेराव 

संबंधित बातम्या