Goa Election: ढवळीकर-फडणवीस भेटीने मगो-भाजप युतीची चर्चा

मगोकडून स्पष्ट इन्कार, आगामी निवडणुकीत मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर (Deepak Dhavalikar) तसेच मगोचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी वारंवार आगामी विधानसभेच्या निवडणुकीत तीन वेळा दगाबाजी केलेल्या भाजपबरोबर युती करणार नाही असे सांगत आले आहे.
Goa Election: ढवळीकर-फडणवीस भेटीने मगो-भाजप युतीची चर्चा
मगोचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी काही दिवसांपूर्वी गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. Dainik Gomantak

पणजी: राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष एकमेकांच्या संपर्कात आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष युतीची बोलणी अजूनही झालेल्या नाहीत असे सांगत असले, तरी गुपचूप समीकरणे व तडजोडी सुरू झाल्या आहेत. भाजपशी (BJP) युती म्हणजे आत्महत्त्या असे वक्तव्य करणारे मगोचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी काही दिवसांपूर्वी गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पुन्हा भाजप - मगो युती होण्याच्या चर्चेला ऊत आला आहे. मात्र, मगोने भाजपशी युती नाहीच असे ठामपणे वक्तव्य केले आहे.

मगोचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी काही दिवसांपूर्वी गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Goa Election 2022: मुख्‍यमंत्र्यांसाठी निवडणूक प्रतिष्‍ठेची

मुंबईत झालेल्या चर्चेत गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुदिन ढवळीकर यांच्याशी गोव्यातील राजकीय स्थितीबाबत खोलवर चर्चा केली. मात्र, ही चर्चा अपूर्णच राहिली आहे. युतीसंदर्भातचा निर्णय मगो कार्यकारी समिती घेईल असे सांगून ही चर्चा सध्या पुढे सरकली नाही. भाजपशी युती करू शकणारा मगो हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे भाजपचे नेते त्यांची मनधरणी करण्याची शक्यता अधिक आहे. इतर पक्षाबरोबर भाजपची युती होणे अशक्य आहे. विरोधकांनी भाजपला सत्तेवरूनच हटवण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे भाजप युती करावी की नाही अशा द्विधास्थितीत आहे. मगोने यापूर्वीच १२ जागांवर उमेदवार निश्‍चित केले आहेत. त्यामुळे ही युती झाल्यास मगोने गेल्या काही महिन्यांपासून केलेल्या मेहनतीवर पाणी फेरणार याचा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही अंदाज आहे. त्यामुळे ही युती सध्याच्या स्थितीवरून अशक्यच दिसत आहे.

आगामी निवडणुकीत मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर तसेच मगोचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी वारंवार आगामी विधानसभेच्या निवडणुकीत तीन वेळा दगाबाजी केलेल्या भाजपबरोबर युती करणार नाही असे सांगत आले आहे. मात्र, त्यांनाही माहिती आहे, की युतीशिवाय ते सत्तेत पुन्हा येऊ शकत नाहीत. भाजपबरोबर युती केली तेव्हा मगोचे तीन आमदार निवडून आले होते, तर मागील निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवून आले. पर्रीकर यांच्या भाजप सरकारला त्यांनी पाठिंबा दिला मात्र पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजपने पक्षाचा पाठिंबा काढून टाकला. सत्तेशिवाय हतबल झालेल्या मगोच्या दोन आमदारांनी मंत्रिपदासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मगोचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी काही दिवसांपूर्वी गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Goa Election: भाजपचा पराभव करण्यासाठी GFP करणार इतर पक्षांशी युती

कोणत्याही पक्षाकडे मी युतीसंदर्भात बोलणी करण्यास गेलो नाही. इतर पक्षांचे नेते मला घरी भेटण्यासाठी आले होते. कोणी भेटण्यास आले तर त्यांना मी परत पाठवू शकत नाही. त्यामध्ये तृणमूलचे प्रशांत किशोर व त्यांची आय पॅक टीम, काँग्रेसचे दिनेश गुंडू राव, फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी भेट घेतली आहे. भाजपशी तीनवेळा युती करून मोठी चूक केली. मात्र आता पुन्हा त्यांच्याबरोबर युती म्हणजे आत्महत्त्या करण्यासारखे आहे.

- सुदिन ढवळीकर, मगो आमदार

भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस हे सुदिन ढवळीकर यांना भेटले याचा अर्थ युती झाली असा होत नाही. यापुढे मगो कधीच भाजपबरोबर युती करणार नाही. मगो पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. येत्या आठवड्यात मगोच्या कार्यकारी समितीची बैठक होईल त्यावेळी काही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल.

- दीपक ढवळीकर, मगोचे अध्यक्ष

Related Stories

No stories found.