Goa Election: रणजीचे माजी कर्णधार रॉबीन डिसोजा काँग्रेसमध्ये

गोव्याला (Goa) बदल हवा आहे, आणि त्यासाठी आपण कॉंग्रेसमध्ये (Congress) दाखल होत आहे. असे डिसोजा (Robin D'Souza) यांनी सांगितले.
Goa Election: रणजीचे माजी कर्णधार रॉबीन डिसोजा काँग्रेसमध्ये
क्रिकेटपटू रॉबीन डिसोजा (Robin D'Souza) यांना कॉंग्रेसमध्ये (Congress) प्रवेश देताना विरोधीपक्षनेते दिगंबर कामत. सोबत प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, वरद म्हार्दोळकर, संकल्प आमोणकर, विजय भिके, विशाल वळवईकर व कॉंग्रेसचे पदाधिकारीसंदीप देसाई

पणजी: गोव्याच्या (Goa) रणजी क्रिकेट (Ranji Cricket) संघाचे माजी कर्णधार रॉबीन डिसोजा (Robin D'Souza) यांनी आज कॉंग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला. पणजी येथील कॉंग्रेस कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत विरोधीपक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) व प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी डिसोजा यांचे कॉंग्रेसमध्ये स्वागत केले. यावेळी युवा कॉंग्रेससचे अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर (Varad Mhardolkar), उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, विशाल वळवईकर व कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

क्रिकेटपटू रॉबीन डिसोजा (Robin D'Souza) यांना कॉंग्रेसमध्ये (Congress) प्रवेश देताना विरोधीपक्षनेते दिगंबर कामत. सोबत प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, वरद म्हार्दोळकर, संकल्प आमोणकर, विजय भिके, विशाल वळवईकर व  कॉंग्रेसचे पदाधिकारी
Goa Election: तृणमूल काँग्रेस गोव्यात सर्व 40 जागा लढविणार

यावेळी बोलताना कामत म्हणाले की लोकांची भावना गोव्यात कॉंग्रेस पुन्ह सत्तेवर यावी अशी आहे. आणि त्यासाठीच रॉबीन डिसोजा सारखे युवा नेतृत्व कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहे. डिसोजा याने टीमचे नेतृत्व केलेले असल्याने तेच नेतृत्व गुण पक्षासाठी लाभदायक ठरणार असल्याचे कामत म्हणाले. विविध क्षेत्रातील युवा नेत्यांची राजकारणात गरज आहे. सध्या गोव्यातील युवा क्रिडापटू कॉंग्रेसमध्ये येत आहेत. ही पक्षासाठी जमेची बाजू ठरणार आहे. कॉंग्रेसची सत्ता गोव्यात यावी असे लोकांना वाटत आहे. असे चोडणकर म्हणाले. गोव्याला बदल हवा आहे. आणि त्यासाठी आपण कॉंग्रेसमध्ये दाखल होत आहे. असे डिसोजा यांनी सांगितले. ॲड. म्हार्दोळकर, भिके व वळवईकर यांनी रॉबीन डिसोजा यांचे स्वागत केले.

Related Stories

No stories found.