बिंबल-सत्तरी येथे निवडणूक अधिकाऱ्यांची गाडी पलटली

दैनिक गोमन्तक
शनिवार, 12 डिसेंबर 2020

बिंबल-सत्तरी येथे महागणपती मंदिराजवळील एका वळणावर निवडणूक कामासाठी जात असलेली एक बोलेरो गाडी पलटली.

वाळपई: बिंबल-सत्तरी येथे महागणपती मंदिराजवळील एका वळणावर निवडणूक कामासाठी जात असलेली एक बोलेरो गाडी पलटली. कोणालाही मोठी इजा झाली नाही. शनिवारी जिल्हा पंचायत निवडणूक होत आहे. 

त्यासाठी पूर्व तयारी म्हणून या बोलेरो गाडीतून निवडणूक कामाचे सेक्टर अधिकारी श्री. सावियो तसेच चालक करोल व एक पोलिस नगरगाव जिल्हा पंचायत मतदार संघातील खोतोडा पंचायत भागात विविध बुथांवर मतदान कामाची तयारी झाली की नाही हे पाहण्यासाठी जात होते. 

आणखी वाचा:

मतदारराजा नवपरिवर्तनासाठी सज्ज -

सेक्टर अधिकारी यांना चौदा बुथांची जबाबदारी दिली आहे. प्रत्येक बुथावर व्यवस्था झाली की नाही, याची पडताळणी करण्यासाठी बोलेरो वाहनातून संबंधित व्यक्ती जात होते. बिंबल येथील एका वळणावर ही गाडी पलटली. गाडीची अवस्था बघता हा अपघात गंभीर स्वरूपाचा घडलेला आहे. हे लक्षात येते. गाडी पलटून एका झाडाला अडकून राहिली. वाहनातील व्यक्तींना जखमी झाल्याने नंतर उपचारासाठी सरकारी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

संबंधित बातम्या