Goa Election: खेळाडू डेन्झिल फ्रँको, लेनी द गामा यांचा तृणमूलमध्ये प्रवेश

फ्रँको (Denzil Franco) हा माजी भारतीय फुटबॉलपटू (Indian football) आहे. त्यांनी भारतासाठी 12 सामने खेळले आहेत. 2021 मध्ये नेहरू चषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे ते भाग होते. द गामा (Lenny the Gamma) हे एक वरिष्ठ बॉक्सिंग (Boxing)अधिकारी आहेत. ज्यांना रेफरी आणि न्यायाधीश म्हणून अनेक वर्षांचा अनुभव आहे.
Goa Election: खेळाडू डेन्झिल फ्रँको, लेनी द गामा यांचा तृणमूलमध्ये प्रवेश
भारताचा (India) माजी फुटबॉलपटू (Footballer) डेन्झिल फ्रँको (Denzil Franco) आणि अनुभवी बॉक्सिंग (Boxing) अधिकारी लेनी द गामा (Lenny the Gamma) यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress) प्रवेश केला आहे. Dainik Gomantak

पणजी: भारताचा (India) माजी फुटबॉलपटू (Footballer) डेन्झिल फ्रँको (Denzil Franco) आणि अनुभवी बॉक्सिंग (Boxing) अधिकारी लेनी द गामा (Lenny the Gamma) यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress) प्रवेश केला आहे. ज्येष्ठ नेते प्रसून बॅनर्जी, पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी (Manoj Tiwari) आणि वकील यतीश नाईक (Yatish Naik) यांच्या उपस्थितीत त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे.

भारताचा (India) माजी फुटबॉलपटू (Footballer) डेन्झिल फ्रँको (Denzil Franco) आणि अनुभवी बॉक्सिंग (Boxing) अधिकारी लेनी द गामा (Lenny the Gamma) यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress) प्रवेश केला आहे.
Goa Election: तृणमूल काँग्रेस गोव्यात सर्व 40 जागा लढविणार

यावेळी बोलताना फ्रँको म्हणाले, ते सालीगाव आणि गोव्याच्या लोकांची सेवा करण्यासाठी टीएमसीमध्ये सामील झाले आहेत. सालिगावातून माझ्या खेळाची कारकीर्दीला सुरुवात झाली आणि येथूनच राजकीय कारकीर्दीला सुरूवात करण्याचे माझे स्वप्न होते. आम्ही येथे सरकार चालवण्यासाठी आलो आहोत, लोकांना मूर्ख बनवण्यासाठी येथे आलो नाही. मला सलीगाव आणि गोवा येथील लोकांची सेवा करण्याची संधी मिळत असल्याचा जास्त आनंद होत आहे.

सालिगावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. “मी सालिगावाला ताजमहाल बनविण्याचे आश्वासन देत नाही पण सालिगावातील लोकांना मूलभूत सुविधा मिळतील याकडे नक्की लक्ष देईन. या गावाला फुटबॉलचा इतिहास आहे, पण याच ठिकाणी फुटबॉलचे मैदान नाही. ही शोकांतीका आहे.

भारताचा (India) माजी फुटबॉलपटू (Footballer) डेन्झिल फ्रँको (Denzil Franco) आणि अनुभवी बॉक्सिंग (Boxing) अधिकारी लेनी द गामा (Lenny the Gamma) यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress) प्रवेश केला आहे.
Goa Election: रणजीचे माजी कर्णधार रॉबीन डिसोजा काँग्रेसमध्ये

ममता बॅनर्जींनी भाजपचा अजेंडा नष्ट केल्याचा दावा करत, ज्येष्ठ बॉक्सिंग अधिकारी द गामा म्हणाले, ममता दीदी फायरब्रँड असून, त्या कोणालाही घाबरत नाहीत. आम्ही गोव्याच्या लोकांसाठी लढू असे त्यांनी स्पष्ट केले.

फ्रँको हा माजी भारतीय फुटबॉलपटू आहे. त्यांनी भारतासाठी 12 सामने खेळले आहेत. 2021 मध्ये नेहरू चषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे ते भाग होते. द गामा हे एक वरिष्ठ बॉक्सिंग अधिकारी आहेत. ज्यांना रेफरी आणि न्यायाधीश म्हणून अनेक वर्षांचा अनुभव आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये 2020 सात आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग तांत्रिक अधिकाऱ्यांमध्येही ते होते.

Related Stories

No stories found.