Goa Election: निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी प्रफुल्ल पटेल गोव्यात

गोव्यात (Goa) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) येणारी निवडणूक युती करून लढविणार की एकला चलो रे लढविणार यावर सविस्तर चर्चा बैठक होणार आहे. तसेच राज्यातील विविध मतदार संघात गाठीभेटी सुरू करणार असणार आहे.
Goa Election: निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी प्रफुल्ल पटेल गोव्यात
दाबोळी विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे स्वागत करताना गोवा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा बाजूस इतर.Dainik Gomantak

दाबोळी: केंद्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) गोवा (Goa) प्रभारी तथा माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांचे गोव्यात आगमन झाले आहे. 2022 मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा (Goa Assembly) निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी पटेल गोव्यात दाखल झाले आहे.

दाबोळी विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे स्वागत करताना गोवा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा बाजूस इतर.
Goa Election: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रादेशिक पक्षांचे युतीचे प्रयत्न

राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी प्रफुल्ल पटेल यांचे गुरुवार (दि.२) दुपारी दाबोळी विमानतळावर आगमन झाले. यावेळी गोवा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत प्रफुल्ल हेदे पक्षाचे सरचिटणीस प्रीतम नाईक व इतर पदाधिकारी उपस्थित होते. गोव्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनीती करण्यासाठी पटेल पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यासाठी आले आहे. गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणारी निवडणूक युती करून लढविणार की एकला चलो रे लढविणार यावर सविस्तर चर्चा बैठक होणार आहे. तसेच राज्यातील विविध मतदार संघात गाठीभेटी सुरू करणार असणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com