उत्पलच्या पराभवाने मी नाराज; फडणवीसांनी दाखवली सहानुभूती

उत्पल पर्रीकर आपल्या पराभवामुळे पुढे काय निर्णय घेणार याकडे जनतेचे लक्ष
goa election result 2022 bjp leader devendra fadnavis is saddened by the defeat of utpal parrikar
goa election result 2022 bjp leader devendra fadnavis is saddened by the defeat of utpal parrikar Dainik Gomantak

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष म्‍हणून निवडणूक लढवलेल्‍या पणजी मतदारसंघाकडेही तमाम देशवासियांचे लक्ष लागून राहिले होते. भाजपने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यापुढे आव्हान होते ते बलाढ्य बाबूश मोन्सेरात यांचे. पणजी मतदारसंघ हा बाबूश यांचा बालेकिल्ला मानला जातो. बाबूश यांना पराभूत करण्यासाठी उत्पल यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांनी बाबूश यांना जबरदस्त टक्कर दिली. बाबूश यांना 6787 तर उत्पल यांना 6071 मते मिळाली. उत्पल यांचा 716 मतांनी पराभव झाला.

goa election result 2022 bjp leader devendra fadnavis is saddened by the defeat of utpal parrikar
गोव्यात मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण? देवेंद्र फडणवीस म्हणतायत..

दरम्यान, भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेही उत्पल पर्रीकर यांच्या पराभवामुळे दु:खी झाले आहेत. त्यांनी उत्पल पर्रीकर यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. फडणवीस म्हणाले, 'बाबूश यांच्या विजयाने खूश आहे, पण उत्पलच्या पराभवाने मी नाराज आहे. 'यामागचे कारण सांगताना फडणवीस म्हणाले की, भाजप (BJP) मनोहर पर्रीकर यांच्या पश्चात कुटुंबाला आपले मानत आहे. मनोहर पर्रीकर यांनी गोवा आणि भाजपसाठी मोठे योगदान दिले आहे. पुढे बोलताना ते अस ही मनाले की योग्य निर्णय घेतला तर उत्पल आमदार झाले असते.

उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) हे आता त्यांच्या पराभवामुळे पुढे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फडणवीस यांनी उत्पल यांच्या पराभवावर सहानुभूती व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार की पुढील निवडणुकीपर्यंत (Election) आपल्या निर्णयावर ठाम राहून मतदार संघात काम करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com