Goa Politics: युतीच्या शक्यतेला राज्यात पुन्हा चालना

तृणमूलचे गोव्यातील आगमन, ‘आप’ चे प्रयत्न आणि आलेक्स रेजिनाल्ड यांचे नाराजीनाट्य
रेजिनाल्ड यांच्या घरी एकमेकांशी चर्चा करताना दिगंबर कामत आणि गोवा फाॅरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई.
रेजिनाल्ड यांच्या घरी एकमेकांशी चर्चा करताना दिगंबर कामत आणि गोवा फाॅरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई. Dainik Gomantak

मडगाव: मी काँग्रेस (Congress) पक्षात अस्वस्थ आहे. माझी या पक्षाने नेहमीच अवहेलना केली. मी पक्ष सोडायचा निर्णय घेतला आहे, अशी गर्जना करणारे कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड (ALEX REGINALD) आपल्या वाढदिनी आम आदमी पक्षात न जाण्याचा निर्णय घेतील, याची कल्पना राजकीय तज्ज्ञांनीही केली नसेल. आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आपल्या बंडाची तलवार म्यान करत मी भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी काँग्रेस पक्षातच राहणार, अशी घोषणा केली तेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat ) यांच्या उपस्थितीत. रेजिनाल्ड यांच्या निर्णयामुळे आता कॉग्रेसच्या राजकीय डावपेचाला वेगळे वळण आले आहे.

लॉरेन्स हे वाढदिनी पक्ष सोडण्याची घोषणा करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, मात्र काल सकाळपासून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी रांग लावली होती, ते पाहून त्यांच्या बंडातील वारे गेले आहे याचे संकेत मिळत होते. सकाळी त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा, महिला आघाडीच्या अध्यक्ष बीना नाईक, जिल्हा समितीचे अध्यक्ष ज्यो डायस, लॉरेन्स यांचे जवळचे मित्र सावियो डिसिल्वा, डिक्सन वाझ, ओलेन्सीयो सिमोईस आदी हजर होते. नंतर दिगंबर कामत हेही उपस्थित झाले होते.

रेजिनाल्ड यांच्या घरी एकमेकांशी चर्चा करताना दिगंबर कामत आणि गोवा फाॅरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई.
Goa Election: रेजिनाल्ड काँग्रेस मध्येच राहणार, वाढदिवशी घोषणा

दरम्यान तृणमूलचे गोव्यातील आगमन, ‘आप’ चे प्रयत्न आणि आलेक्स रेजिनाल्ड यांचे नाराजीनाट्य या सर्व गोष्टींमुळे गोव्यातील काँग्रेस पक्षातील प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे महत्त्व कमी झाल्याचे सांगण्यात येत असून या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि गोवा फॉरवर्ड या तीन पक्षांच्या युतीच्या शक्यतेला पुन्हा एकदा चालना मिळाल्याची चर्चा जोर धरत आहे.

रेजिनाल्ड यांच्या घरी एकमेकांशी चर्चा करताना दिगंबर कामत आणि गोवा फाॅरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई.
पी चिदंबरम पुन्हा गोवा दौऱ्यावर

आतापर्यंत जे काय होऊन गेले ते विसरून सर्वांनी भाजपविरोधात एकत्र येऊन लढण्याची गरज सर्वांनी व्यक्त केली. याच चर्चेच्या पार्श्वभूमीवर रेजिनाल्ड यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आलेले विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचे एकमेकांशी झालेले बोलणेही बरेच काही सुचविणारे होते. आमच्या या बोलण्याचा युतीच्या निर्णयाशी कोणताही संबंध नाही, हे दोघेही सांगत असले तरीही दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या दृष्टीने हे शुभसंकेत असल्याचे मत इतर नेते व्यक्त करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com