Goa Election: शिवसेनेची मोर्चे बांधणी सुरू, 29 रोजी संजय राऊत गोव्यात
Goa Election: Sanjay Raut on Goa Official tour for elections on 29th September Dainik Gomantak

Goa Election: शिवसेनेची मोर्चे बांधणी सुरू, 29 रोजी संजय राऊत गोव्यात

संजय राऊत (Sanjay Raut) हे येत्या 29 व 30 रोजी दोन दिवसाच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत.

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात (Goa Assembly Election 2022) विविध राष्ट्रीय पक्षांच्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर आढावा घेण्यासाठी तसेच शिवसेना (Shivsena) नेते व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे गोवा राज्य संपर्क नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे येत्या 29 व 30 रोजी दोन दिवसाच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत. या भेटीदरम्यान ते पक्षाच्या बैठका तसेच पक्षाची तयारी याचा आढावा घेणार आहेत . (Goa Election: Sanjay Raut on Goa Official tour for elections on 29th September)

Goa Election: Sanjay Raut on Goa Official tour for elections on 29th September
Goa Politics: फालेरो यांच्या राजीनाम्यानंतर काय...

यासंदर्भात अधिक माहिती देताना गोवा राज्य शिवसेना प्रमुख जीतेश कामत यांनी सांगितले की, खासदार राऊत यांच्या भेटीवेळी मांद्रे, पेडणे येथे पक्षाच्या कार्यालयाचे उद्‍घाटन तसेच कुठ्ठाळ्ळी व पणजीत काहीजण शिवसेनत प्रवेश करणार आहेत. ते 29 रोजी दुपारनंतर गोव्यात येणार आहेत.

गोव्याला सध्या पक्षांतराचा रोग जडला असून मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरू आहे. शिवसेनेला नेहमी राज्यातील इतर पक्ष कमी लेखले जाते व ताकद नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे प्रत्येक पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवावी तेव्हा प्रत्येकाला आपापली ताकद कळेल हे शिवसेनेचे आव्हान आहे. शिवसेनेचा विस्तार करण्याबरोबर ताकद दाखवून देण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत (Goa Election) 20 ते 25 जागा स्वबळावर लढविल्या जातील, अशी माहिती यापूर्वीच संजय राऊत यांनी पाटकर परिषदेत दिली होती.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com