Goa Election: शिवसेना 20 जागा लढविण्याच्या तयारीत, महाराष्ट्र पॅटर्न राबविण्याचाही विचार

गोव्यामध्ये (Goa) देखील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सारखा प्रयोग करण्याचा आमचा विचार आहे. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री बदलणे हा त्या राज्याचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे.
Goa Election: शिवसेना 20 जागा लढविण्याच्या तयारीत, महाराष्ट्र पॅटर्न राबविण्याचाही विचार
गोव्यात (Goa) आम्ही निवडणूक नक्की लढतो आहोत.Dainik Gomantak

मुंबई: गोव्यात (Goa) आम्ही निवडणूक नक्की लढतो आहोत. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मध्ये देखील 80 ते 90 जागा लढविण्याचा देखील आमचा विचार सुरू आहे. तसेच आम्ही युती करु शकतो याबाबत पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. असे शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सांगितले.

गोव्यात (Goa) आम्ही निवडणूक नक्की लढतो आहोत.
Goa Election: बंडोबांमुळे काँग्रेसच्या वाटेत काटे

राऊत म्हणाले, हवेत गोळीबार करून चालत नाही आणि कोणी कोणाच्या थोबाडीत वगैरे मारत नाहीत. चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे आणखी कोणी लोक असतील ते अशा प्रकारच्या अफवा पसरवत असतात. त्यांनी तो आनंद घ्यावा पण वारंवार हेच सांगतो की हे सरकार पुढील तीन वर्ष देखील उत्तम प्रकारे चालेल आणि त्यानंतर देखील महाविकास आघाडीच सत्तेवर येईल.

गुजरातमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत बोलताना ते म्हणाले, एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री बदलणे हा त्या राज्याचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्याच्यावरती इतरांनी भाष्य करण्याची गरज आहे. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाची स्थिती तितकीशी बरी नाहीये.

गोव्यात (Goa) आम्ही निवडणूक नक्की लढतो आहोत.
Goa Election: उमेदवारी दिल्लीतूनच असे सांगत, बंडाळींवर भाजपचा तात्पुरता तोडगा

गोव्यात महाराष्ट्र पॅटर्न राबविण्याचा विचार

उत्तर प्रदेशमध्ये काही शेतकरी संघटना आहेत, या संघटनांनी सांगितले आहे की तुम्ही निवडणूक लढा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. इतर काही लहान पक्ष आहेत, त्यांनीदेखील शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. गोव्यामध्ये देखील महाविकास आघाडी सारखा प्रयोग करण्याचा आमचा विचार आहे. त्याला कितपत यश येते त्यासंदर्भात निश्चित काही सांगता येणार नाही पण त्या संदर्भात हालचाली सुरू आहेत. तेथे महाविकास आघाडी मध्ये शिवसेनेला चांगले स्थान मिळाले तर नक्कीच शिवसेना त्यामध्ये सहभागी होऊ शकेल.

उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आपोआप देशाचा नेता होत असतो. असे राऊत यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com