Goa: तुयेतील धनगर वस्‍तीतील चार घरात सौर ऊर्जेद्वारे वीज
Congress office bearers with the residents of Tuye Dhangar samajDainik Gomantak

Goa: तुयेतील धनगर वस्‍तीतील चार घरात सौर ऊर्जेद्वारे वीज

तुये येथील धनगरसमाज वस्तीतील ४ घरांत मांद्रेचे युवा काँग्रेस नेते सचिन परब यांच्यामार्फत सौर उर्जेतर्फे विजेचे दिवे प्रकाशित करण्यात आले.

मोरजी: मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे, (Mandrem MLA Dayanand Sopate)यांनी विकासकामांसाठीच जर काँग्रेसचा त्याग करून भाजपात प्रवेश केला. तर त्यांनी आपल्‍याच मतदारसंघातील तुये येथील धनगर समाजातील चार घरांना वीज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधा का दिल्‍या नाहीत, असा संतप्त सवाल गोवा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उपस्थित केला. तुये (Tuyem) येथील धनगरसमाज वस्तीतील ४ घरांत मांद्रेचे युवा काँग्रेस नेते सचिन परब (Sachin Parab)यांच्यामार्फत सौर उर्जेतर्फे विजेचे दिवे प्रकाशित करण्यात आले. धनगर वस्‍तीत ९० वर्षांनंतर दिवे प्रकाशित झाल्याने त्‍या नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते. यावेळी युवा काँग्रेस नेते सचिन परब, माजी मंत्री संगीता परब, काँग्रेस महिला अध्यक्ष बिना नाईक, वरद म्हार्दोळकर, नारायण रेडकर, उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष विजय भिके, रेखा महाले, आनंद शिरगावकर, लक्ष्मीकांत शेटगांवकर, अनिता वाडजी, सरपंच सुहास नाईक, पंच आनंद साळगावकर, माजी सरपंच किशोर नाईक यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.

Congress office bearers with the residents of Tuye Dhangar samaj
Goa: दारूची तस्करी बंद करा

गिरीश चोडणकर (Girish Chodankar) म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा गरिबांपर्यंत पोहोचणारा पक्ष आहे. विद्यमान भाजप सरकारने ठरवले असते, तर या घरांपर्यंत वीज दिली असती. मात्र, सरकारला गरिबांचे काही पडलेले नाही. सचिन परब यांनी गरीब कुटुंबियांना विजेची सोय करून सरकार, मुख्यमंत्री, स्थानिक आमदार दयानंद सोपटे आणि धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Babu Kavalekar) यांच्‍या कार्यपद्धतीबाबत प्रश्‍‍नचिन्हे उपस्‍थित केली आहे. सचिन परब म्हणाले, आपण कधी मतांची गणिते केली नाही किंवा राजकीय लाभ उठवण्यासाठी दिवे प्रकाशित केले नाही. गरिबांच्या घरात दिवे प्रकाशित होतात, यापेक्षा दुसरा आनंद आम्हाला नाही. यावेळी वरद म्हार्दोळकर, विजय भिके व नारायण रेडकर यांनी विचार व्यक्त केले.

Congress office bearers with the residents of Tuye Dhangar samaj
Goa: शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे कृषी खात्याला मुख्यमंत्र्यांचे आदेश

Related Stories

No stories found.