क्लाफासिओ डायस: कोरोना महामारीच्या जबड्यातून पुनर्जन्म घेतला...

वार्ताहर
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

आमदार क्लाफासिओ डायस यांचे भावूक उद्‍गार

दाबोळी: देवाच्या कृपादृष्टीने तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माझ्या मतदारसंघातील हितचिंतकांनी व गोव्यातील जनतेने माझ्या आरोग्यासाठी केलेली प्रार्थना त्यामुळेच मी आज कोरोना महामारीच्या जबड्यातून सावरून पुनर्जन्म घेतला आहे. त्यासाठी मी सर्वांचा ऋणी आहे. असे भावनात्मक उद्गार मुरगाव नगर नियोजन विकास प्राधिकरणचे चेअरमन तथा कुकळीचे आमदार क्लाफासिओ डायस यांनी काढले.

 कोरोना महामारीच्या विळख्यातून सावरून तीन महिन्यानंतर बुधवार (दि.१६) रोजी आमदार क्लाफासिओ डायस हे कार्यालयात रुजू झाले. ३० जून रोजी कोरोना महामारीचा संसर्ग झाल्याने डायस यांना  इस्पितळात दाखल केले होते. 

मध्यंतरी प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये सुमारे वीस दिवस ठेवण्यात आले होते. सलग तीन महिने कोरोना महामारीच्या या भयंकर रोगाचा सामना करून सावरलेल्या कुंकळ्‍ळीचे आमदार तथा मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाचे चेअरमन क्लाफासिओ यांना ८ ऑगस्‍ट रोजी डिस्चार्ज देण्यात आला. त्‍यानंतर काही काळ घरी विश्रांती  घेतल्यानंतर मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाचे चेअरमन क्लाफासिओ यांचे आज वास्कोत मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात आगमन झाले. 

यावेळी त्यांचे एमपीडीएचे सदस्य सचिव के. अशोक कुमार यांनी पुष्पगुच्छ देऊन तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. तसेच कार्यालयात पाऊल ठेवण्यापूर्वी यांचे कार्यालयीन कर्मचारी महिला तर्फे औक्षण करून त्यांचे स्वागत केले. 

यावेळी श्री. डायस म्हणाले की, या महामारी पासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यावी, तसेच सामाजिक अंतरा बरोबर मास्क परिधान करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच बाहेरून आल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुणे, सॅनिटायझर वापरणे हे नित्याचेच ठेवावे. जेणेकरून आपल्या आरोग्याला कोणत्याही प्रकारची बाधा पोहोचणार नाही. याची खबरदारी प्रत्येकाने आपल्यापरीने घ्यावी असा निर्वाणीचा सल्ला यावेळी श्री डायस यांनी समस्त गोव्यातील जनतेला दिला. माझ्या या कोविड महामारीच्या आजारपणात मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केपेचे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर खंबीरपणे उभे राहिल्याने तसेच माझ्या मतदारसंघातील मतदार, तसेच समस्त गोव्यातील जनतेने माझ्या बचावासाठी देवाकडे केलेल्या प्रार्थनामुळे आज मी पुनर्जन्म घेऊन उभा राहिलो आहे असे भावूक होऊन श्री. डायस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

दरम्यान, चार महिन्यानंतर आज आमदार क्लाफासिओ डायस यांनी आपले कार्यालय गाठले व अनिर्णीत फाइल्स हातावेगळ्या करण्याचे काम हाती घेतले. तत्पूर्वी त्याने सर्व प्राधिकरणा सदस्यांची बैठक घेतली व अनिर्णित कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी बैठकीला वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, मुरगावचे नगराध्यक्ष नंदादिप राऊत, सदस्य चंद्रकांत गावस, राजन डिचोलकर, चिखलीचे उपसरपंच कमला प्रसाद यादव, सांकवाळचे पंच नारायण नाईक व इतर सदस्य उपस्थित होते. मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाचे कार्यालयीन कर्मचारी वर्ग रमेश पार्सेकर (नियोजन सहाय्यक), मार्कोस फर्नांडिस (आर्किटेक्चर सहाय्यक), संदीप नाईक ( ड्राफ्टमन), धर्मेंद्र मराठे ( ड्राफ्टमन), चंद्रा सातार्डेकर (निरीक्षक), सुसान डिसोजा (हेडक्लार्क) सुवर्णा माडोळकर (जूनियर स्टेनो), झिलू पै नाईक ( यूडीसी) मंगलदास नाईक ( यूडीसी), प्रतिमा वराडकर, शुभम लोयलेकर, अनुज शिरोडकर दीक्षा नायक ( एलडीसी), सचित गावकर (ऑफिस बॉय), छाबू केरकर, श्रीमती नाईक (स्वीपर) व ॲण्‍ड्र्यू कारव्‍हालो (चालक) आदींनी पुष्पवर्षाव करून आमदार श्री डायस यांचे स्वागत 
केले.

संबंधित बातम्या