टाळेबंदीच्या काळात शेती व्यवसायातून रोजगार

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

या काळात पेडणे तालुक्यातील ११३ शेतकऱ्यांनी पेडणे कृषी कार्यालयात जाऊन कृषी कार्ड करून घेतले. यामुळे कृषी खात्याच्या योजनेनुसार मिळणाऱ्या सवलती त्यांना मिळू लागल्या. 

पेडणे: कोरोना महामारीच्या काळात अनेकांना नोकरी गेल्याने, तसेच व्यवसाय बंद असल्याने सक्तीने घरी राहावे लागले. पेडणे तालुक्याचा विचार करता ९५ टक्के लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे.  कोरोनाकाळात अनेकांनी शेतीकडे लक्ष दिले. वेगवेगळी पिके घेतली. या काळात पेडणे तालुक्यातील ११३ शेतकऱ्यांनी पेडणे कृषी कार्यालयात जाऊन कृषी कार्ड करून घेतले. यामुळे कृषी खात्याच्या योजनेनुसार मिळणाऱ्या सवलती त्यांना मिळू लागल्या. 

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध भाजीपाला व फळ फळावळीची १३५ किलो बियाणे अनुदान पद्धतीने देण्यात आली. त्यात भेंडी, मुळे, तांबडी भाजी, चिटकी, कारली, काकडी, कोकण दूधी, भोपळा, कोहळा यांची बियाणांचा समावेश होता. 

चारशे एकर शेतीत ४०० तास अनुदान पध्दतीवर पेडणे कृषी कार्यालयाच्या ट्रॅक्टरद्वारे नांगरणी झाली. टाळेबंदीच्या काळात कृषी कार्यालयातून  घेतलेल्या बियाणाद्वारे जी बियाणे घेतली, त्याचा फायदा म्हणजे ज्यावेळी बाजार दुकाने बंद होता. तसेच नंतर भाजीपाला उपलब्ध झाला. तेव्हा त्याचे दर बरेच महाग होते, अशावेळी हा भाजी पाला वापरता आला. दुसरे म्हणजे  टाळेबंदीच्या काळात कोकण दूधी, भोपळा, कोहळा यासारख्या पिकांचे अजूनही मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाले. त्यावर शेतकऱ्यांना चांगला रोजगार प्राप्त झाला.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या