Goa: परप्रांतीय महिला मासे विक्रेत्यांनी भाजी मार्केट रस्त्यावर केले अतिक्रमण

या महिलांना कितीवेळा हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. परंतू ते पालिकेच्या (municipality) अधिकारी व कामगारांशी लपाछपीचा खेळ खेळतात.
Goa: परप्रांतीय महिला मासे विक्रेत्यांनी भाजी मार्केट रस्त्यावर केले अतिक्रमण
दुचाकी पार्किंग केलेल्या रस्त्यावरच मासळी विक्री करताना परप्रांतीय महिलाDainik Gomantak

दाबोळी: वास्को येथे साळगावकर इमारतीनजीकच्या भाजी मार्केट (Market) रस्त्यावर काही परप्रांतीय महिलांनी मासे विक्री करताना मुरगाव पालिकेसमोर आव्हान उभे केले आहे.या महिलांना तेथून हुसकावून लावण्याचे अनेक प्रयत्न मुरगाव पालिकेने केले आहेत,परंतू पालिकेच्या अधिकारी (Municipal Officer) व कामगारांना त्या महिला दाद देत नसल्याचे चित्र वास्कोवासियांना पाहण्यास मिळते.या महिला दिवसाकाठी मोठ्या प्रमाणात तेथे मासे विक्री करतात. त्यांनी रस्त्यावरच अतिक्रमण केल्याने तसेच त्यांच्याकडून मासळी घेण्यासाठी वाहने उभी करण्यात येत असल्याने इतर वाहनचालकांची गैरसोय होत आहे.

येथील मासळी मार्केटची (fish market) बैठी इमारत पाडून त्याठिकाणी नवीन दुमजली इमारत बांधण्याचे काम जीसुडाला मुरगाव पालिकेने दिले आहे. परंतू शहर भागातील घाऊक मासळी विक्री तसेच रस्त्याकडेला होणारी किरकोळ मासळी विक्री बंद झाल्याशिवाय आम्ही पर्यायी जागी जाणार नसल्याची भूमिका मार्केटातील मासळी विक्रेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे मुरगाव पालिकेसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. घाऊक मासळी विक्रेत्यांपैकी काहीजणांनी मासळी विक्री बंद केली आहे. मात्र रस्त्याकडेला मासळी विक्री करणारया परप्रांतीय महिलांनी मुरगाव पालिकेला हतबल केले आहे.

दुचाकी पार्किंग केलेल्या रस्त्यावरच मासळी विक्री करताना परप्रांतीय महिला
Goa:मेजर पोर्ट अथॉरिटीज कायदा, मेजर पोर्ट ट्रस्ट कायदा रद्द करण्याबाबत चिंता

या महिलांना कितीवेळा हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. परंतू ते पालिकेच्या अधिकारी व कामगारांशी लपाछपीचा खेळ खेळतात. अधिकारी तेथे आले की त्या महिला तेथून पळ काढून दुसरीकडे मासळी विकतात. अधिकारी गेला की पुन्हा त्या जागेवर येतात. त्यामुळे त्यांना कसे आवरावे हा प्रश्न मुरगाव पालिकेसमोर आहे.या महिलांविरोधी कारवाई (Action) करावी अशी मागणी मार्केटातील विक्रेते करतात.मात्र या महिलांना घाऊक दराने मासळी कोण विकतो हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ग्राहकांना ताजी व स्वस्त मासळी मिळत असल्याने ग्राहक त्यांच्याकडे गर्दी करीत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com