आता गोव्यात शूटिंग बंद...मनोरंजन संस्थेचा निर्णय

Shooting licenses were revoked in Goa
Shooting licenses were revoked in Goa

पणजी: महाराष्ट्रात कडक टाळेबंदी लागू केल्यानंतर चित्रिकरणासाठी अनेकांनी गोव्यात धाव घेतली होती. गोवा (goa) मनोरंजन (Entertainment) संस्था या सरकारी संस्थेने (Government Organization) तब्बल तीस चमूना राज्यभरात चित्रीकरणासाठी कोविड (Corona) महामारीच्या काळातही परवानगी दिली होती, असे आज उघड झाले. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी मडगावच्या रवींद्र भवनात जाऊन तेथील चित्रीकरण बंद पाडल्यानंतर आता संस्थेने सर्व चित्रीकरण परवानग्या मागे घेतल्या आहेत. (Goa Entertainment Organization has revoked all shooting permits)

आमदार विजय सरदेसाई यांना श्रेय जाऊ नये, यासाठी त्यांनी चित्रीकरण बंद करण्याआधीच हा निर्णय घेतला होता, असा दावा संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. राज्यभरात चित्रीकरणासाठी परवानगी देण्याचे अधिकार या संस्थेकडे आहेत. फळदेसाई यांनी सांगितले, की बाह्य चित्रीकरणास परवाननी दिलेली नव्हती. इमारतीतील चित्रीकरणास सशर्त परवानगी देण्यात आली होती. तिसेक जणांकडे अशी वैध परवानगी होती. 

कोविड महामारीच्या काळात संसर्ग वाढीस चित्रीकरण कारण ठरू नये, त्‍यासाठी काल मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव परीमल राय, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तारीक थॉमस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या परवानग्या मागे घेण्याचे ठरवण्यात आले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com