गोव्याच्या किनाऱ्याला तेलगोळ्यांचे सावट; जीवसृष्टी धोक्यात

किनारे काळवंडले: तेलवाहू जहाजातील सांडपाणी सोडण्याच्या प्रमाणात वाढ
Goa Environment गोव्याच्या किनाऱ्याला तेलगोळ्यांचे सावट; जीवसृष्टी धोक्यात
Goa Environment गोव्याच्या किनाऱ्याला तेलगोळ्यांचे सावट; जीवसृष्टी धोक्यातDainik Gomantak

मडगाव: तेलवाहू जहाजातील सांडपाणी समुद्रात सोडण्याचे प्रमाण वाढल्याने यंदा गोव्यात तब्बल 13 वेळा तेलगोळे वाहून येऊन किनाऱ्यावर पडण्याच्या घटना घडल्या असून हे प्रमाण धोकादायक असल्याचे सांगितले जाते. या तेलगोळ्यांमुळे किनाऱ्यावरील जीवसृष्टीही धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

2015 पासून आतापर्यंत तेलगोळ्यांमुळे वेगवेगळ्या ठिकाणी किनारपट्टी काळी होण्याचे 33 प्रकार उघडकीस आले असून 2015 नंतर यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर तेलगोळे किनाऱ्यावर थडकले असल्याची माहिती पर्यावरणमंत्री (Goa Environment) नीलेश काब्राल यांनी दिली.

Goa Environment गोव्याच्या किनाऱ्याला तेलगोळ्यांचे सावट; जीवसृष्टी धोक्यात
मुख्यमंत्र्यांकडून ‘एसीजीएल’ कामगारांना तात्पुरता दिलासा..

मिळालेल्या माहितीनुसार, 2015 साली असे 12 प्रकार आढळून आले होते. 2016 मध्ये 4, तर 2017 मध्ये असे दोन प्रकार घडले होते. 2019 आणि २०२० मध्ये प्रत्येकी एक असा प्रकार आढळून आला होता. यंदा हे प्रमाण बेसुमार वाढले असून सप्टेंबर महिन्यात एकाच दिवशी गोव्यातील 12 किनाऱ्यांवर असे तेलगोळे आढळून आले. त्यात उत्तर गोव्यात मांद्रे, हरमल, मोरजी, केरी, आश्वे, कळंगुट - बागा, करंझाळे व मिरामार, तर दक्षिण गोव्यात वेळसाव, कासावली व केळशी या किनाऱ्यावर ते आढळून आले होते.

तेलगोळ्यांचे मूळ स्रोत मुंबईत : हे तेलगोळे तयार होण्याचे मूळ स्रोत मुंबईत जिथे तेल टाक्या आहेत तिथून असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अभ्यासातून दिसून आले असून या तेलगोळ्यांचे उगमस्थान गोव्याच्या हद्दीबाहेर असल्याने या समस्येवर उचित तोडगा काढण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पावले उचलावीत अशी त्यांना राज्य सरकारने विनंती केली आहे, अशी माहिती मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com