Goa Environment: पेडणेतील ‘धवरूख’च्‍या तरुणांची कृतिशील मोहीम

‘धवरूख’ ही संस्‍था पावसाळ्यात पाणी अडविणे, झाडे लावणे यासारखी काम करते, तर पावसाळ्यानंतर पाण्यासंदर्भात जनजागृती होते.
Goa Environment
Goa EnvironmentDainik Gomantak

Goa Environment: ‘धवरूख’ या पर्यावरणसंबंधी आमच्या संस्थेची साडेपाच वर्षांपूर्वी 2017 मध्‍ये स्थापना झाली. आमच्या बालपणात विहिरी, झरे, नाले आदी ठिकाणी मुबलक पाणी असायचे यामुळे पाण्याची कुठलीही समस्या जाणवली नव्हती.

पण तरुणपणी अवतीभवती पाण्याची समस्या जाणवू लागली. त्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, असे वाटू लागले. यासंबंधी गावातील मित्रांशी चर्चा केली व ‘भूजल संवर्धन मोहीम’ राबविण्याचे ठरविले, असे मांद्रे येथील ‘धवरूख’ या संस्थेचे अध्यक्ष रुद्रेश म्हामल म्‍हणाले.

Goa Environment
Mahadayi Water Dispute: लोकप्रतिनिधींचे म्हादईबाबत अज्ञान त्यामुळेच...

काही वर्षांपूर्वी डोंगरावर लोक शेती करायचे, नांगरणी तसेच माती खणल्याने, बांध घातल्याने, बंधारे बांधल्याने पाणी जमिनीत मुरत असे व ते विहिरी, झऱ्यांना मिळत असे; पण बहुतांश शेती बंद झाल्याने ही नैसर्गिक प्रक्रिया बंद झाली.

अनेक ठिकाणी इमारती किंवा इतर कामांसाठी क्रॉंक्रिट घालून जमीन आच्छादित केल्याने तर साधे रस्त्याशेजारचे गटारही कॉंक्रिटने बांधण्यात येत असल्याने पाणी जमिनीत मुरण्याची प्रक्रिया बंद होऊन हे सगळे पाणी वाहत समुद्रात जाऊन वाया जाते.

सरकारी यंत्रणा तितकी कार्यरत नाही व सर्वसामान्य लोकांना याची जाणीव नाही. पण आम्हाला हे समजते. आता उपाययोजना केली नाही तर येत्या दहा-पंधरा वर्षांत ही पाण्याची समस्या आणखीन गंभीर होईल, हे मित्रांच्या लक्षात आणून दिले, असे म्हामल म्‍हणाले.

म्‍हणून आम्‍ही झाडे लावतो...

  • झाडांमुळे पावसाचे पाणी थेट जमिनीवर न पडता झाडांवरून जमिनीवर पडते व जमिनीत मुरते. झाडांमुळे सावळी होते व जमिनीत ओलावा राहतो तसेच पाऊस पडण्यासाठी गारवा निर्माण करण्याची वातावरण निर्मितीही झाडांमुळेच होते. म्हणून आमची संघटना दरवर्षी झाडे लावते.

  • आमची संघटना संकटात सापडलेल्या प्राण्यांना जीवनदान देण्याचे कामही करते. दरवर्षी फक्त पावसाळ्यात झाडे न लावता त्यांची वर्षभर निगा घेतो. त्यासाठी लहान मुलांच्या वाढदिवसानिमित्त झाडे लावतो. त्यामुळे त्या मुलांबरोबर त्यांचे आईवडीलही त्या झाडांची काळजी घेतात.

Goa Environment
Mahadayi water: अन्याय घडो, कुठेही पेटून उठू आम्ही..म्हणत ‘म्हादई बचाव’ सभेला नागरिकांचा उत्सुर्त प्रतिसाद

भविष्‍यातील योजना

कूपनलिकांचा वापर : ‘धवरूख’ ही संस्‍था पावसाळ्यात पाणी अडविणे, झाडे लावणे यासारखी काम करते, तर पावसाळ्यानंतर पाण्यासंदर्भात जनजागृती होते. गावात अनेक ठिकाणी जुन्या बंद झालेल्या बोअर वेल (कूपनलिका) आहेत. अशा कूपनलिकांचा उपयोग करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.

जनसहभाग वाढवणार : पेडणे तालुक्यातील सगळ्या ग्रामपंचायत व शैक्षणिक संस्थांना आमच्या या भूजल संवर्धन मोहिमेला सहकार्य करा, म्हणून प्रत्यक्ष भेटून विनंती पत्रे देणार आहोत. पर्वरी येथील विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांद्वारे ही योजना पुढे नेऊ.

सरकारने अट घालावी : सरकारने मनावर घेतल्यास भूजलसंबंधी खूप काही करू शकते. शाळा, कॉलेज किंवा नवीन घरे बांधताना वॉटर चार्जर बांधण्याची अट घातल्यास त्याचा बराच फायदा होऊ शकतो, असे रुद्रेश म्हामल म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com