Goa: कळंगुटमध्ये बनावट कॉल सेंटर टोळीचा पर्दाफाश

कळंगुटमध्ये (Calangute) कारवाई, सातजणांना अटक, अमेरिकन नागरिकांना लुटत होते. संशयिताच्‍या खोलीतून सर्व्हरसह ३० लॅपटॉप्स, २५ लॅपटॉप चार्जर्स, २४ हेडफोन्स, ॲडॉप्टर्ससह दोन रावटर व मोबाईल फोन्स जप्त केले आहेत. त्याची किंमत सुमारे २० लाख रुपये आहे.
Goa: कळंगुटमध्ये बनावट कॉल सेंटर टोळीचा पर्दाफाश
गांवकरवाडा-कळंगुट (Calangute) येथील एका हॉटेलात बनावट कॉल सेंटर (Fake call center) टोळीचा पर्दाफाश करण्यात आला.Dainik Gomantak

पणजी: गांवकरवाडा-कळंगुट येथील एका हॉटेलात बनावट कॉल सेंटर (Fake call center) सुरू करून अमेरिकेतील नागरिकांना (Citizens of the United States) गुन्हे केल्याची तसेच कर चुकविल्याची धमकी अमेरिकन सरकारच्यावतीने देत फसवणूक करीत लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. कळंगुट पोलिसांनी (Calangute police) सात जणांना अटक केली. त्यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या कारवाईवेळी पोलिसांनी सुमारे 20 लाख रुपयांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू (Electronic goods) साहित्य जप्त केले. ही कारवाई काल 30 रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास करण्यात आल्याची माहिती उत्तर गोवा पोलीस (Goa Police) अधीक्षक शोबित सक्सेना (Shobit Saxena) यांनी दिली.

गांवकरवाडा-कळंगुट (Calangute) येथील एका हॉटेलात बनावट कॉल सेंटर (Fake call center)  टोळीचा पर्दाफाश करण्यात आला.
Goa: अडवई सत्तरीतील सिलिंडर स्फोटात घर जळून खाक; सुदैवाने जीवितहानी टळली

अशी आहेत नावे : या कारवाईवेळी अटक करण्यात आलेल्यांची नावे मौसम कुमार (३१, गुजरात), जय रुपारेल (२६, गुजरात), जॅकी सामनी (२६, ठाणे - महाराष्ट्र), अरिंदम लगाचू (१९, अरुणाचल प्रदेश), मिलॉन हुसेन (२३, मेघालय), कुमारी टेचिना मरक (२२, शिलॉँग) व कुमारी स्वेता रायकर (१९, दिल्ली) यांचा समावेश आहे.

संशयिताच्‍या खोलीतून सर्व्हरसह ३० लॅपटॉप्स, २५ लॅपटॉप चार्जर्स, २४ हेडफोन्स, ॲडॉप्टर्ससह दोन रावटर व मोबाईल फोन्स जप्त केले आहेत. त्याची किंमत सुमारे २० लाख रुपये आहे असे सक्सेना यांनी सांगितले. सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संदेश चोडणकर तसेच कळंगुटचे पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्यासह पोलिस पथकाने ही कारवाई केली.

गांवकरवाडा-कळंगुट (Calangute) येथील एका हॉटेलात बनावट कॉल सेंटर (Fake call center)  टोळीचा पर्दाफाश करण्यात आला.
Goa: नुकसान भरपाई त्वरित द्या, मयेतील शेतकऱ्यांची मागणी

अमेरिकन कायद्याचा बडगा दाखवत होते

संशयित अमेरिकन नागरिकांना कॉल करून ते अमेरिकन कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या मंत्रालयाशी संबंधित अधिकारी असल्याचे भासवत होते. ते ड्रग्ज प्रकरणात गुंतल्याचा तसेच सरकारी करचुकवेगिरी केल्याचा धाक दाखवित तसेच अमेरिकन कायद्याचा बडगा दाखवित प्रकरण सामंजस्याने सोडविण्याचे आमिष दाखवून गिफ्टच्या नावाखाली त्यांच्याकडून हजारो लाखों डॉलर भारतीय रुपयाच्या मोबदल्यात उकळत होते. ही रक्कम पॅक्सफूल ॲप किंवा बिट कॉईन किंवा क्रिप्टो वॉलेट या इलेक्ट्रॉनिक सोशल माध्यमातून जमा करण्यास सांगत होते. भयभीत झालेल्या काहींनी ही रक्कम पाठविली मात्र काहींना त्याचा संशय आल्याने त्याची माहिती गोवा पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे या टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अनेकांचे धाबे दणाणले!

बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी छडा लावल्यामुळे या भागात कार्यालये स्थापन करून तसेच विविध क्लृप्त्या लढवून विदेशींना फसविणाऱ्या अनेकांचा पर्दाफाश होणार असल्याचा विश्वास कळंगुटचे सरपंच शॉन मार्टिन्स यांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.