बळीराजाला आता नवे उत्सवाची प्रतीक्षा

परतीच्या पावसाने कालपासून विश्रांती घेतल्यानंतर बळीराजाच्या चेहऱ्यावरील चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.
बळीराजाला आता नवे उत्सवाची प्रतीक्षा
BicholimDainik Gomantak

डिचोली: परतीच्या पावसाने कालपासून विश्रांती घेतल्यानंतर बळीराजाच्या चेहऱ्यावरील चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. दुसऱ्याबाजूने डिचोलीतील (Bicholim) मये, पिळगाव आदी भागात भातपिक कापणीसाठी तयार झाले असले, तरी पारंपरिक 'नवे' करण्यात आले नसल्यामुळे कापणीच्या कामांना हात घालता येत नाही. त्यामुळे कधी एकदा 'नवे' अर्थातच देवदेवतांना भाताचे कणीस अर्पण करण्यात येते, आणि कापणी करायला मिळते, त्याची प्रतीक्षा बळीराजाला लागून राहिली आहे. तूर्तास पारंपरिक 'नवे' उत्सव (Nave Festival) साजरा होईपर्यंत पावसाची कृपादृष्टी राहू दे. असे शेतकऱ्यांना मनोमनी वाटत असून, ते वरुणराजाला साकडेही घालत आहेत. डिचोलीतील मये, पिळगाव आदी बहूतेक भागात भात कापणीसाठी तयार झाल्यानंतर नवे उत्सव साजरा करण्यात येतो. देवदेवतांना भाताची कणसे अर्पण केल्यानंतरच बळीराजा भात कापणीच्या कामांना हात घालतो. तशी पूर्वापारपासून परंपरा चालत आली आहे.

Bicholim
Goa: नवी निवडणूक आयोग वेबसाईट लाँच

मयेत रविवारी 'नवे' उत्सव

मयेतील प्रसिद्ध 'नवे' उत्सव येत्या रविवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. तर पिळगाव येथील 'नवे' उत्सव दसरोत्सवानंतर साजरा करणार येणार असल्याची माहिती मिळाली आहे. देवदेवतांना भाताचे पहिले कणीस अर्पण करून 'नवे' केल्याशिवाय शेतकरी भाताची कापणी करीत नाही. अशी मये गावची परंपरा आहे.

Related Stories

No stories found.