गोव्यातील शेतकऱ्यांची दिल्ली आंदोलनाकडे कुच

दैनिक गोमन्तक
रविवार, 13 डिसेंबर 2020

जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील शेतकरी आठवड्याभरात दिल्लीकडे कुच करतील,

पणजी: जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील शेतकरी आठवड्याभरात दिल्लीकडे कुच करतील, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बर्डे यांनी आज येथे दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी बर्डे येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्‍हणाले, शेतकऱ्यांचे हित नेहमीच पवार यांनी जपले. त्यांना या प्रश्नांची नेमकेपणाने जाण आहे. ते केंद्रीय कृषीमंत्री असताना कृषी क्षेत्राची भरभराट झाली. त्यांनी अनेक पुरोगामी असे निर्णय घेतले. त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार केला. त्यांनी आताच्या सरकारलाही अनेक सुचना केल्या होत्या. मात्र, सरकारने मनमानी करत शेतकऱ्यांना उद्‍ध्वस्त करणारे कायदे केले आहेत. त्याविरोधात आता शेतकरी पेटून उठला आहे.

दक्षिण गोव्यातील बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला -

शेतकरी शेतात राबतो, काबाडकष्ट करतो, घाम गाळतो आणि शेतीतून सोने पिकवतो. तो पूर्वीपासूनच आत्मनिर्भर आहे. या भाजप आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्याला संपवण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले आहेत. इतर क्षेत्रे भांडवलदारी अर्थव्यवस्थेने खिशात टाकली आहे. आता शेतीही भांडवलदारांच्या हातात गेली की शेतकऱ्याचा शेत मजूर होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी न्याय्य मागण्यासाठी दिल्लीत आंदोलन सुरु केले आहे त्याला आम्ही राज्यातील शेतकरी पाठिंबा देत आहोत, असे ते म्हणाले.

आणखी वाचा:

सिंधुदुर्ग विमानतळाच्या विकासकामाला वेग ;  जानेवारी 2021 पर्यंत कार्यान्वित होणार -

ते म्हणाले, गोव्यातही शेतीचे प्रश्न आहे. विकासाच्या वा प्रकल्पांच्या नावाखाली जमीन हिसकावून घेतली जात आहे. विशेषतः शहरालगत असलेल्या शेत जमिनींवर विकसकांची नजर असते आणि त्यांना सरकारचा आशीर्वाद असतो. कसेल त्याची जमीन असा कायदा कागदावरच राहिला आहे. कुळ मुंडकारांचे प्रश्न राज्य मुक्तीची षष्ठ्यब्दीपूर्तीकडे झेपावतानाही कायम आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आणि राज्याला भेडसावणारे अनेक प्रश्न दिल्लीतील मंचावर मांडण्यासाठी आम्ही दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आठवडाभरात आम्ही दिल्लीला जाऊ, तेथील संपकरी शेतकरी नेत्यांच्या आम्ही संपर्कात आहोत.

संबंधित बातम्या