Railway Timetable: कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

Railway Timetable: 19 व 20 नोव्हेंबर रोजी स्टेशन थांब्यात बदल करण्यात आला आहे
Railway Timetable |Goa News
Railway Timetable |Goa NewsDainik Gomantak

Railway Timetable: मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मस्जिद दरम्यान असलेला कार्नेक रोड ओव्हरब्रिज पाडण्यात येणार असल्याने कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात 19 व 20 नोव्हेंबर रोजी स्टेशन थांब्यात बदल करण्यात आला आहे, अशी माहिती कोकण रेल्वेतर्फे देण्यात आली.

मध्य रेल्वेने 19 व 20 नोव्हेंबर रोजी कार्नेक रोड ओव्हरब्रिज पाडण्यात येणार असल्याने हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदच्या काळात कोकण रेल्वेच्या काही गाड्या स्टेशन थांब्यात आणि वेळेत बदल केला आहे. यात ट्रेन क्रमांक 12052 मडगाव स्टेशन ते मुंबई सीएसटी दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस 19 व 20 नोव्हेंबर रोजी दादर रेल्वे स्टेशनपर्यंत थांबा घेणार आहे.

Railway Timetable |Goa News
Mopa Airport Inauguration : मोपा विमानतळाच्या लोकार्पणासाठी 11 डिसेंबरची तारीख निश्चित, पण...

ट्रेन क्रमांक 22120 मडगाव स्टेशन ते मुंबई सीएसटी दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस 19 व 20 नोव्हेंबर रोजी दादर रेल्वे स्टेशनपर्यंत थांबा घेणार आहे. ट्रेन क्रमांक 10104 मडगाव स्टेशन ते मुंबई सीएसटी दरम्यान धावणारी मांडवी एक्सप्रेस 19 व 20 नोव्हेंबर रोजी पनवेल स्टेशनपर्यंत थांबा घेणार आहे. ट्रेन क्रमांक 10112 मडगाव स्टेशन ते मुंबई सीएसटी दरम्यान धावणारी कोकणकन्या एक्सप्रेस 19 व 20 नोव्हेंबर रोजी पनवेल स्टेशनपर्यंत थांबा घेणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com