'गोवा' रतन टाटांचा फेवरेट..!

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा अनेकदा प्राण्यांवर, विशेषत: त्यांच्या कुत्र्यांवरील प्रेमाबद्दल पोस्ट्स शेअर करतात. दिवाळीच्या दिवशी टाटा यांनी 'गोवा' नावाच्या त्यांच्या “ऑफिस सोबती” सह दिवाळी साजरा केल्याची पोस्ट शेअर केली होती.

मुंबई : टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा अनेकदा प्राण्यांवर, विशेषत: त्यांच्या कुत्र्यांवरील प्रेमाबद्दल पोस्ट्स शेअर करतात. दिवाळीच्या दिवशी टाटा यांनी 'गोवा' नावाच्या त्यांच्या “ऑफिस सोबती” सह दिवाळी साजरा केल्याची पोस्ट शेअर केली होती. “या दिवाळीत बॉम्बे हाऊसमध्ये दत्तक घेतलेल्या कुत्र्यांसह काही हृदयस्पर्शी क्षण, विशेषत: 'गोवा', माझ्या कार्यालयातील सहकारी,” अशा आशयाची पोस्ट रतन टाटांनी इन्सटाग्रामवर शेअर केली होती.

मुंबईतील भटक्या कुत्र्यांसाठी घर असलेली ही जागा टाटा समूहाच्या जागतिक मुख्यालयाचा एक भाग आहे. यातील ‘गोवा’ हा कुत्रा टाटांचा आवडता असल्याचे म्हटले जाते. रतन टाटांचे इन्सटाग्रामवर 3 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स असल्यामुळे कुत्र्याचे नाव ‘गोवा’ का ठेवले गेले याबद्दल प्रश्न उपस्थित होऊन ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. या प्रश्नांना उत्तर देताना टाटांनी सांगितलं की, “तो लहान आसताना गोव्यातील माझ्या सहकाऱ्याच्या गाडीत सापडला होता, आणि तिथून तो बॉम्बे हाऊसमध्ये आला. महणून त्याचं नाव गोवा ठेवण्यात आले.
 

अधिक वाचा :

गोव्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला मिळणार प्रतिटन तीन हजारांचा भाव

गोव्यातील मिरामार समुद्र किनाऱ्यावर कोरोनाच्या नियमांचे पालन न करता छठ पुजा साजरी

गोव्यातीत विद्यार्थ्यांना मिळणार शाळेतून कडधान्‍ये

संबंधित बातम्या