Goa: वेलांकनी सायबिणीचे फेस्त भक्तीमय वातावरणात संपन्न

कोरोना नियमावलीचे पालन करून फेस्त साजरे (Goa)
Goa: वेलांकनी सायबिणीचे फेस्त भक्तीमय वातावरणात संपन्न
वेलांकनी सायबिणीची मूर्ती (Goa)Dainik Gomantak

Goa: नवेवाडे वास्को येथे वेलांकनी सायबिणीचे फेस्त (Velankanni Fest) मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. कोरोना नियमावलीचे (Following Corona SOPs) पालन करून सदर फेस्त साजरे करण्यात आले. गेला आठवडाभर वेलांकनी सायबीणीचा नोवेना (Novena) नंतर काल सायबिणीचे फेस्त ख्रिस्ती बांधवातर्फे (Christian Families of Goa) साजरे करण्यात आले. त्यानिमित्त विविध ठिकाणी प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे (Covide Epidemic) फेस्तावर विरजण पडले होते. त्यानुसार हे सायबिणीचे फेस्त साजरे करण्यात आले नव्हते. मात्र यंदा परिस्थिती नियंत्रणात असल्याने सणासुदीला उजाळा मिळाला आहे. त्यानुसार ख्रिस्ती बांधवातर्फे वेलांकनी सायबीणीचे फेस्त साजरे केले. आठ दिवस नोवेना साजरे केल्या नंतर नवव्या दिवशी फेस्त साजरे करण्यात आले. नोवेनाच्या प्रत्येक दिवशी संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक दिवशी सर्व धर्मिय लोक आपल्या परीने सायबीणीला साडी हार किंवा फराळ भेट म्हणून देत होते. तो फराळ मग प्रार्थना सभेत उपस्थित लोकांना वितरित करण्यात येत आला.

वेलांकनी सायबिणीची मूर्ती (Goa)
कोरोना, महागाईचे संकट तरीही गणेश भक्तांचा उत्साह कायम!

दरम्यान काल वेलांकनी सायबीणीचे फेस्त बालगोपाळा समवेत मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरे करण्यात आले. यावेळी बाल गोपाळातर्फे केक कापण्यात आला, तत्पूर्वी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. नंतर केक कापून उपस्थितांना फराळाचे वाटप करण्यात आले. डॉमनिक फर्नांडिस यांने सदर सायबीणीची मूर्ती चेन्नई येथील पवित्र स्थान वेलांकनी येथून आणून तिची दहा वर्षांपूर्वी स्थापना केली होती. त्यानुसार आज पर्यंत अविरत सेवा सुरू आहे. या उत्सवात सर्व धर्मीय लोक भाग घेतात.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com