Goa: चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदत

साकवाळ पंचायत क्षेत्रातील चक्री वादळाने नुकसान झालेल्या कुटुंबांना पंचायतीतर्फे आर्थिक सहकार्य करण्यात आले.
सांकवाळ पंचायत क्षेत्रात तोक्ते वादळात नुकसानग्रस्तांना आर्थिक सहकार्य भेटविण्याच्या  कार्यक्रमात पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, सरपंच रमाकांत बोरकर व इतर
सांकवाळ पंचायत क्षेत्रात तोक्ते वादळात नुकसानग्रस्तांना आर्थिक सहकार्य भेटविण्याच्या कार्यक्रमात पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, सरपंच रमाकांत बोरकर व इतरDainik Gomantak

दाबोळी: भारतात समुद्रकिनाऱ्याजवळील राज्यांना तोक्ते चक्रीवादळाच्या (Cyclone Tauktae) तडाख्याने मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागले होते. गोव्यात (Goa) सुद्धा तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. यात नुकसान झालेल्यांना राज्य सरकार बरोबर स्थानिक पंचायतीने आर्थिक सहकार्य केली आहे. साकवाळ पंचायत क्षेत्रातील चक्री वादळाने नुकसान झालेल्या कुटुंबांना पंचायतीतर्फे आर्थिक सहकार्य करण्यात आले.

सांकवाळ पंचायत क्षेत्रात तोक्ते वादळात नुकसानग्रस्तांना आर्थिक सहकार्य भेटविण्याच्या  कार्यक्रमात पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, सरपंच रमाकांत बोरकर व इतर
गोवा ट्रिपला जाताय? 'या Goan Food' चा आनंद नक्की घ्या

साकवाळ पंचायत क्षेत्रातील घरांना तोक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते. यात अनेकांच्या घरावर झाडाच्या मोठ्या फांद्या, विजेचे खांब पडल्याने त्यांच्या घराचे नुकसान झाले होते. तोक्ते वादळाने साकवाळ भागालासुद्धा तडाखा दिल्याने सरपंच रमाकांत बोरकर व इतर पंच सदस्यांनी जातीने लक्ष देऊन नागरिकांची सेवा केली होती. तसेच साकवाळ पंचायत सचिवांमार्फत नुकसान झालेल्या घराची पाहणी करून त्यांना आर्थिक सहकार्य देण्याचे आश्वासन सरपंच बोरकर यांनी दिले होते.

सांकवाळ पंचायत क्षेत्रात तोक्ते वादळात नुकसानग्रस्तांना आर्थिक सहकार्य भेटविण्याच्या  कार्यक्रमात पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, सरपंच रमाकांत बोरकर व इतर
Goa Murder case: पुरावे नसताना चौधरी यांनी केला तरुणीच्या अपहरण झाल्याचा दावा

साकवाळ पंचायत क्षेत्रात तोक्ते चक्रीवादळातून वादळाने नुकसान झालेले रहिवाशी खालील प्रमाणे. विशाल गाड, वैकुंठ नाईक, जोस फर्नांडिस, पुष्पा नाईक, सुशांत नाईक, अंतोनिओ सावीयो, आरावजो, अनिल हळदणकर, अमिता उमेश नाईक, भोजो नागू नाईक, मुरलीधर नाईक, लतिका विश्वनाथ नाईक, कमला नाईक, तुकप्पा लमाणी, शंकर लमाणी, रोझालीना मोनीज, तारासिंग लमाणी, जासिन्तो डिक्रूज, कमलादेवी यादव, वीरेंद्र कुमार त्रीपाठी, कामिलो फर्नाडिस, राजू नाईक यांना आर्थिक सहकार्य पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्या उपस्थितीत भेटविण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत सरपंच रमाकांत बोरकर, उपसरपंच सुकोरीना वालीस, पंचक गिरीश पिल्ले, गोविंद लमाणी, हरीश कादर, नंदिनी देसाई, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, लिगोर मोंन्तेर, सचिव कृष्णा गावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com