
वास्को: आयओसी जंक्शन (IOC Junction) जवळ होणारा प्रास्तावित रॅम्प प्रकल्पाला बिगर सरकारी संस्था गोवा फर्स्टने (Goa First) आक्षेप घेतला आहे. वास्को हे नियोजनबद्ध शहरापैकी एक आहे आणि अशा अनियोजित वास्तु विषारदामुळे शहराचा नाश होईल. तसेच, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी (Traffic Jam) निर्माण होईल. असे म्हणत गोवा फर्स्टने रॅम्प प्रकल्पाला आक्षेप घेतला आहे.
एमपीए मध्ये जाणाऱ्या उड्डाण पुलाला जोडून वास्को (Vasco) शहरात उतरण्यासाठी येथील एफ एल गोम्स महामार्गावर उड्डाणपुलाचा एक भाग उतरवला जाईल. त्यासाठी एफएल गोम्स मार्गवर या प्रस्तावित प्रकल्पासाठी रॅम्प उभारण्याचा उभारण्याच्या हालचाली सुरू झाले आहे. 2018 साली या कामाला सुरुवात होणार होती. मात्र गोवा फर्स्ट (Goa First) या बिगर सरकारी संस्थेने सदर काम बंद करण्यास भाग पाडले होते. यावेळी सदर प्रकल्प रद्द करण्यात आला होता. आता हा प्रकल्प पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, या प्रास्तावित प्रकल्पाला गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेने पुन्हा एकदा आक्षेप घेतला आहे. कारण रस्त्याची सध्याची रुंदी अंदाजे 18 मीटर आहे जी दहा ते अकरा मीटर इतकी कमी केली जाईल. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी (Traffic Jam) निर्माण होईल. त्यामुळे आयओसी टर्मिनल, पोलीस स्टेशन, हॉटेल्स, मॉल, वास्को मशिद आणि भाजी मार्केट या आस्थापनाना या रॅम मुळे प्रभावित होतील.
वास्को हे नियोजनबद्ध शहरापैकी एक आहे आणि अशा अनियोजित वास्तु विषारदामुळे शहराचा नाश होईल. मुरगाव मतदार संघातील लोकांना याचा सर्वाधिक फटका बसेल. कारण एकएलगोम्स रस्ता आणि स्वतंत्र पथ हे फक्त दोन रस्ते आहेत जे मुरगाव ते वास्कोला थेट जोडतात. एमपीएकडे पुरेशी जागा असल्याने अधिकाऱ्यांना हा प्रकार थांबवण्यास आणि स्क्रॅप करण्यास संस्थेने सांगितले आहे. याआधी एमपीए मैदान येथे समान रॅम्प प्रवेशाची योजना आखली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.