'गोवा फर्स्ट’ची स्थापना ही अफवा- मंत्री मायकल लोबो

lobo.jpg
lobo.jpg

पणजी: आगमी विधानसभा निवडणुकीत भाजपला (bjp) किती जागा मिळतील हे आता मी सांगू शकत नाही व माझी भूमिका काय असेल हे मी योग्य वेळ आल्यावर तसेच 20 नोव्हेंबरनंतर वा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सांगीन. ‘गोवा फर्स्ट’ (Goa First) या राजकीय पक्षाची स्थापना होणार आहे ही फक्त अफवा आहे. गेली 15 वर्षे भाजपचा सदस्य आहे. गोव्याच्या हितासाठी सरकारविरोधात विधाने केली तर पक्षविरोधी कारवाया केल्याचा संशय घेतला जातो. कोणीही कोणत्याही मतदारसंघात काम करू शकतो असे मत कळंगुटचे (Kalangut) आमदार व ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो (Michael Lobo) यांनी व्यक्त केले. 

राज्यात ‘गोवा फर्स्ट’ हा राजकीय पक्ष अस्तित्वात येणार असल्याची चर्चा आहे याचा इन्कार करून मंत्री मायकल लोबो म्हणाले की, भाजपचा मी सदस्य आहे व मंत्री या नात्याने कोणत्याही मतदारसंघातील लोकांना माझी मदत हवी असल्यास ती देण्यास मी तेथे जाईन. काही चांगल्या कामासाठी कोणत्याही मतदारसंघात जाण्यास हरकत नाही व सर्व मतदारसंघातील कामे करण्यासाठीच मंत्री असतो. मला त्यासाठी कोणीही फोन करून कामासंदर्भात बोलू शकतो. काहींना वाटते की मी सरकारविरोधात बोलतो मात्र गोव्याच्या हितासाठी हे सर्व काही करतो. कोविड काळात म्हणावी तशी कामे होऊ शकली नसली तरी ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत उद्याने, बाल मैदाने तसेच सभागृह बांधकामे झाली आहेत, असे लोबो म्हणाले.  (Goa First is rumored to be founded by Minister Michael Lobo)

दरवर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी नव्या राजकीय पक्ष नावारुपास येतात मात्र राज्यातील मतदार हुशार आहेत. मतदारांची कामे झाली तरच ते आमदाराबरोबर राहतात. त्यामुळे असे नवीन राजकीय पक्ष तयार झाले तरी काम करणाऱ्या आमदारांना कोणतीच भीती नाही. 

राज्यात सध्या कोरोना महामारी (covid19) आहे त्यामुळे विविध प्रकारचे विषाणू लाटेत येत असतात. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. गोव्यात प्रवेश करणाऱ्यांना आरटीपीसीआर निगेटीव्ह चाचणी किमान सप्टेंबरपर्यंत सक्तीचीच करायला हवी. त्यानंतर राज्यात असलेल्या स्थितीनुसार राज्याच्या सीमा खुल्या कराव्यात की नाही याचा निर्णय घेण्याची गरज आहे असे मायकल लोबो यांनी सांगितले. 

येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 25 जागा मिळतील असा दावा भाजपच्याच आमदाराने केला आहे यासंदर्भात प्रतिक्रिया देताना मंत्री लोबो म्हणाले की, हे त्या आमदाराचे विचार आहेत त्याच्यावर मी बोलू शकत नाही. भाजपला किती जागा मिळतील याबाबत मी आताच भविष्यवाणी करू शकत नाही. मागील निवडणुकीवेळी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) तसेच माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांना निवडणुकीच्या चार महिने आधी भाजपला निवडणूक परिस्थिती अनुकूल नसल्याची माहिती दिली होती. यावेळीही मी येत्या नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये भाजपच्या परिस्थितीवर प्रकाशझोत टाकीन असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com