मोफत कोरोना तपासणी करणारे गोवा देशातील पहिले राज्य

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 13 एप्रिल 2021

यंत्रणेंतर्गत राज्यातील कोरोना रुग्णांच्या मोफत तपासण्या होणार आहेत. तसेच मोफत तपासणी करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली आहे.

पणजी : गोवा सरकारने कोरोना रुग्णांचे गंभीर आजार शोधून त्यावर वेळीच योग्य उपचार करण्याचे निदान करणारी व विविध विषाणूंच्या तपासण्या करणारी डी डीमेर, सायटोकेन स्टॉर्म, इंटरलेंकीन आदी सहा तपासण्या करणारी यंत्रणा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या यंत्रणेंतर्गत राज्यातील कोरोना रुग्णांच्या मोफत तपासण्या होणार आहेत. तसेच मोफत तपासणी करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली आहे.

आरोग्‍यमंत्र्यांनी घेतला आढावा
आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी आज कोरोना नियंत्रणासाठी स्थापन केलेल्या तज्‍ज्ञ डॉक्टरांच्या समितीची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील कोरोना स्‍थितीचा आढावा घेतला. तसेच दक्षिण जिल्हा इस्पितळातील कोरोना उपचार केंद्रांसाठी लागणाऱ्या उपकरणांबाबत चर्चा केली. या बैठकीनंतर बोलताना राणे यांनी सांगतले की, कोरोना रुग्णाच्या विविध चाचण्या घेऊन त्यांना लवकर बरे करण्यास व मृत्यूंचे प्रमाण रोखण्यास ही नवी तपासणी यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. 

जिल्‍हा इस्‍पितळातही यंत्रणा
कोविड 19 सबंधीच्या इतर काही चाचण्याही या यंत्रणेद्वारे करण्यास मदत होणार आहे. ही तपासणी यंत्रणा सध्या गोमेकॉत बसवली जाईल व कालांतराने दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातही बसवण्यात येणार आहे. या तपासण्यांमध्ये युके, अमेरिका आदी देशांत सापडलेले  विविध प्रकारचे कोरोना विषाणू तपाण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर जीनोमी, स्ट्रेन आदी  विषाणूं तपासण्याही होणार आहेत. सध्या या तपासण्या पुणे येथे होत आहेत. दरम्यान, दक्षिण गोवा इस्पितळ तथा कोरोना उपचार केंद्रात डॉक्टर व परिचारिकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ये-जा करण्यासाठी खास शटल बस सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राणे यांनी दिली आहे.

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी धरली गोव्याची वाट

राज्यात लसीकरणाला लोकांकडून मोठ्या प्रमणात प्रतिसाद लाभत असल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अतिरिक्त एक लाख कोविड लसीकरण डोसची मागणी लेखी पत्र पाठवून केली आहे.

 ‘रेमेडेसिव्हिर’ उपलब्‍धतेचे निर्देश
कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्‍यक असलेल्या रेमेडेसिव्हिर या संसर्गविरोधी औषधांची पुरेशी यादी तयार ठेवण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासन खात्याच्या संचालक ज्योती सरदेसाई यांच्याशी झालेल्या चर्चेवळी करण्यात आल्या आहेत. गोव्यातील लोकांना रेमेडेसिव्हिर हे औषध सहज उपलब्ध व्हावे यासाठी औषध उत्पादन एजन्सींना सूचना करण्यात आल्या आहेत.

गोवा: आगामी 2022 च्या विधानसभा निवडणुका आम आदमी पक्ष स्वबळावर लढवणार 

संबंधित बातम्या