अतिवृष्टीमुळे काणकोणात मासे, भाजी महागली

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

एका बाजूने कोरोनाच्या महामारीची झळ व दुसऱ्या बाजूला जीवनावश्यक वस्तूच्या वाढलेल्या किंमती यामुळे सामान्य नागरिक महागाईत होरपळला जात आहे. 

काणकोण: काणकोणात अतिवृष्टीचा परिणाम म्हणून मासे, भाजी महागली आहे. भाजीचे दर दुप्पटीने वाढले आहेत. एका बाजूने कोरोनाच्या महामारीची झळ व दुसऱ्या बाजूला जीवनावश्यक वस्तूच्या वाढलेल्या किंमती यामुळे सामान्य नागरिक महागाईत होरपळला जात आहे. 

वीस रुपये किलो असलेला कांदा ५० ते ६० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. साठ रुपये किलो दराने विकण्यात येणारी वालपापडी व चिटकीमिटकी आता १२० रुपये किलो दराने विकण्यात येते. गाजर १८० रुपये किलो, बटाटे ५० रुपये किलो अशा सर्वच भाज्याच्या किमंतीत दुप्पटीने वाढ झाली आहे. याबाबत भाजी विक्रेत्यांना विचारले असता, अतिवृष्टीमुळे भाज्याची आवक घटली आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या