Goa Fish: मासेमाऱ्यांच्या जाळ्यात बांगडे आणि कोळंबी

साळ नदीवर निर्माण झालेल्या रेतीच्या पट्टयामुळे ट्रॉलर्स जेटीवर परतण्यास बाधा (Goa Fish)
Goa Fish: मासेमाऱ्यांच्या जाळ्यात बांगडे आणि कोळंबी
Fishermen when classifying fish in Margao (Goa Fish)Sushant Couclikar / Dainik Gomantak

मडगाव: दर्या (Sea) शांत झाल्याने आठ दिवसांपूर्वी दर्यात सोडलेले ट्रॉलर्स (Trollar) आज कुटबण येथील जेटीवर (Jetty) परतले. येताना त्यांनी बांगडे (Mackerel) आणि कोळंबी (Prawns) मोठयाप्रमाणात घेऊन परतले. मागचे आठ दिवस या जेटीवर सामसूम होती. मात्र कालपासून मच्छीचे ट्रॉलर्स परतल्याने येथील लगबग वाढली. येथील मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष फ्रांको मार्टिन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार काल काही ट्रॉलर बांगडे घेऊन परतले तर आज दोन ट्रॉलर कोळंबी घेऊन किनाऱ्यावर दाखल झाले. (Goa Fish)

 The fisherman fills fish in fish tray
The fisherman fills fish in fish traySushant Couclikar / Dainik Gomantak

वास्तविक हे ट्रॉलर आठ दिवसांपूर्वी मासेमारी करण्यास गेले होते मात्र समुद्र खवळलेला असल्याने (The turbulent Sea) आणि साळ नदीच्या मुखावर रेतीचा पट्टा तयार झाल्याने या ट्रॉलर्सना परत जेटीवर येण्यास त्रास होत होता. मात्र कालपासून समुद्र शांत झाल्याने थोडे थोडे ट्रॉलर आता परत येऊ लागले आहेत.

Fishermen when classifying fish in  Margao (Goa Fish)
श्रावण मासारंभाने डिचोलीत फुलांना 'अच्छे दिन'

यावेळी समुद्र खवळलेला असल्याने मासेमारी सुमारे 10 दिवस उशिरा सुरू झाली होती. त्यामुळे अंडी घालून परतणारी सोलर कोळंबी पकडणे शक्य झाले नाही. त्यामुळे मासेमारांचे नुकसान झाल्याची माहिती मार्टिन्स यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com