Goa: गोमंतकीय जनतेचे मत्स्यप्रेम सर्वश्रुत!

Panjim Fish Market: गणपतीचे विसर्जन होईपर्यंत अनेक कुटुंबे शाकाहारी भोजन करत असतात.
Fish Market
Fish MarketDainik Gomantak

Panjim Fish Market: गोमंतकीय जनतेचे मत्स्यप्रेम सर्वश्रुत आहे. ताटात मासळी असेल तर पोटात दोन घास जास्त उतरतात. मात्र श्रावणापासून गणपतीचे विसर्जन होईपर्यंत अनेक कुटुंबे शाकाहारी (शिवराक) भोजन करीत असतात. गणपती बाप्पाचे आगमन होऊन दीड दिवसांच्या तसेच पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले आहे त्यामुळे गोमंतकीय मासळीवर ताव मारणारच. मासळी खरेदीसाठी सोमवारी पणजी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

काल संध्याकाळीच मासळी बाजारात (Fish Market) खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात चढाओढ सुरू होती. बाजारात मोठ्या प्रमाणात इसवण, पापलेट, सुंगठे (कोळंबी), माणकी, खेकडे, बांगडे, तार्ली, कर्ली आदी मासळी विक्रीसाठी उपलब्ध होती. एकंदरीत, नव्या मासेमारी हंगामानंतऱ पहिल्यांदाच विक्रीत तेजी दिसून येत आहे.

Fish Market
Petrol-Diesel Price|गोव्यात पेट्रोल-डिझेल महागले?

काल सोमवार असल्याने अनेकजण विसर्जनानंतरदेखील मासळीची चव चाखू शकले नव्हते. त्यामुळे कालच्यापेक्षा आज अधिक मासळी विक्री होईल. तसेच आज वाढत्या मागणीच्या अनुषंगाने आजच्या तुलनेत मासळीचे दरदेखील वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही

Fish Market
Drug Case In Goa|हणजूण पोलिसांचा छापा चरस जप्त; एकास अटक

* सळीचे दर प्रतिकिलो

इसवण 600

पापलेट 1000

सुंगठे-कोळंबी 400-500

(आकारानुसार)

माणकी 350-400

खेकडे 350

बांगडे 200-250

खेकडे 350

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com