Karnataka's Trawlers Seized : गोव्याच्या हद्दीत मासेमारी करणारे कर्नाटकचे 3 ट्रॉलर्स जप्त

मच्छिमार खात्याची कारवाई; पकडलेल्या मासळीचा लिलाव करणार असल्याची मंत्री हळर्णकर यांची माहिती
Trawler from Karnataka seized
Trawler from Karnataka seized Dainik Gomantak

Karnataka's Trawlers seized: गोव्याच्या सागरी हद्दीत येऊन मासेमारी करणाऱ्या कर्नाटकच्या तीन ट्रॉलर्सना सोमवारी गोव्याच्या मासेमारी खात्याने पकडले. हे तिन्ही ट्रॉलर्स जप्त केले असून पणजी जेटीवर आणले आहेत. मच्छिमार मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी ही माहिती दिली. (Goa Fisheries Department)

Trawler from Karnataka seized
Police Warns Dog Owner: कुत्र्याला मोकाट सोडल्याने मालकाविरोधात पोलिसांत तक्रार

हे ट्रॉलर्स मुळचे मालपे (कर्नाटक) येथील आहेत. त्यांनी पकडलेल्या सर्व मासळीचा लिलाव केला जाणार आहे. अधिकाऱ्यांना योग्य त्या कारवाईचे निर्देश दिले आहेत, असेही मंत्री हळर्णकर यांनी सांगितले.

राज्यात बेकायदेशीरीत्या एलईडी मासेमारी होत असल्याचे उघड झाल्यानंतर मच्छीमार खात्यावर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे मच्छीमार खाते बऱ्यापैकी सक्रिय झाले असून बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

दरम्यान, सर्व मच्छीमार जेटींवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असल्याची माहिती काही दिवसांपुर्वी मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी दिली होती.

Trawler from Karnataka seized
Mopa Airport: विमानतळ बांधकाम करणाऱ्या कंपनीकडून पगार देण्यास टाळाटाळ; 38 लाख रुपये देणे बाकी

राज्यात शाश्‍वत मासेमारीला चालना देण्याची गरज असून एलईडी मासेमारी कोणत्याही स्थितीत बंद होईल याची दक्षता घेणार आहे. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचे असून वास्को येथील खारीवाडा जेटीवर काम सुरु झाले आहे. राज्यातील इतर जेटींवरही लवकरच काम सुरू होणार आहे. एखाद्या जेटीवर एलईडी मासेमारी होत असल्याचे पुरावे मिळाल्यास त्या जेटीवरील मच्छीमार खात्याच्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com