Goa: रात्रभर सुरु असलेल्या संततधार पावसामुळे काणकोणात पूरसदृश्य परिस्थिती

काणकोणात (Canacona) गेल्या चोवीस तासांत ४.३३ इंच पावसाची नोंद झाली आहे.आता पर्यंत काणकोणात ११६.८३ इंच पाऊस झाल्याचे जलस्त्रोत खात्याच्या अभियंता कल्पना वेळीप यांनी सांगितले.
Goa: रात्रभर सुरु असलेल्या संततधार पावसामुळे काणकोणात पूरसदृश्य परिस्थिती
काणकोणात पूरसदृश्य परिस्थिती.Dainik Gomantak

काणकोण: काणकोणात (Canacona) रात्रीच्यावेळी पडत असलेल्या संततधार पावसामुळे (Rain) काही भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पैगीण पंचायत (Pagin Panchayat) क्षेत्रातील पैगीण गालजीबाग आदिव्हाळ रस्त्यावर पाणी चढल्यानंतर काही काळ रस्ता वाहतुकीसाठी बंद राहिला. २००९ मध्ये आलेल्या पूरात याच ठिकाणी पूराच्या पाण्यात वाहून दोघांचा मृत्यू झाला होता.पाण्याचा विसर्ग सुरळीत होण्यासाठी आदिव्हाळ साकवाच्या नाल्यावर लाखो रूपये खर्चून नाल्यातील गाळ उपसा करून नाल्याची रूंदी वाढवून बांधणी करण्यात आली होती. मात्र अभियांत्रिकी दोषामुळे पावसाचे पाणी भरून आदीव्हाळ रस्ता पाण्याखाली गेल्याचे येथील रहिवासी व्यंकटराय नाईक यांनी सांगितले.

काणकोणात पूरसदृश्य परिस्थिती.
Goa: राज्यात पुढील दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी, अतिवृष्टीचा इशारा

काणकोणात गेल्या चोवीस तासांत ४.३३ इंच पावसाची नोंद झाली आहे.आता पर्यंत काणकोणात ११६.८३ इंच पाऊस झाल्याचे जलस्त्रोत खात्याच्या अभियंता कल्पना वेळीप यांनी सांगितले.चापोली जलाशयात सद्या ३८.८७ जलसाठा आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com