Goa: 'माय बाप सरकार आम्हाला घर उभे करण्यास आर्थिक मदत कधी करणार'?

म्हादई नदीने 23 जुलै रोजी पहाटे रुद्र रूप धारण करून, शेकडो वर्षांपासून वास्तव्य करून राहणाऱ्या सुमारे 49 कुटुंबाचे संसार एका क्षणात उद्ध्वस्त करून टाकले आहे.
भटवाडी अडवई येथे जमीनदोस्त झालेल्या सावईकर यांच्या घराची पाहणी करताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे व इतर
भटवाडी अडवई येथे जमीनदोस्त झालेल्या सावईकर यांच्या घराची पाहणी करताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे व इतरबि डी मोटे

पिसुर्ले: पर्ये मतदार संघात येणाऱ्या भिरोंडा पंचायत (Bhironda Panchayat) क्षेत्रात दि. 23 रोजी आलेल्या पुरात अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. त्यात बऱ्याच जणांची घरे कोसळली तरी काहीजणांच्या घरात पाणी शिरून माणसे रहाण्यास ती घरे असुरक्षित बनलेले आहेत. त्यामुळे सलग चौथ्या दिवशी या घरातील कुटुंबांना नातेवाईक तसेच शेजाऱ्यांनी दिलेल्या आधारावर दिवस काढीत, माय बाप सरकार आम्हाला घर उभे करण्यास आर्थिक मदत कधी करणार याची वाट पाहत आहे. त्याच प्रमाणे आज उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक (North Goa MP and Union Minister Shripad Naik) आणि राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Health Minister Vishwajit Rane) यांनी या पंचायत क्षेत्रात पुरामुळे जास्त फटका बसलेल्या भटवाडी अडवई येथील सावईकर कुटुंबाच्या पडलेल्या घराची पाहणी करून त्या कुटुंबाची विचार पुस केली.

भटवाडी अडवई येथे जमीनदोस्त झालेल्या सावईकर यांच्या घराची पाहणी करताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे व इतर
Goa: पेडणे तालुक्यात ३० लाखांचे नुकसान

सदर भागात म्हादई नदीने दि 23 रोजी पहाटे रुद्र रूप धारण करून, शेकडो वर्षांपासून वास्तव्य करून राहणाऱ्या सुमारे 49 कुटुंबाचे संसार एका क्षणात उद्ध्वस्त करून टाकले, त्यामुळे काही जण स्वताचा निवारा असताना बेघर झाले तर काही जण निवारा असुन सुद्धा आसारा घेऊ शकत नाही अशा स्थितीत येथिल पुरग्रस्त बांधव दिवस काढीत आहे. त्यामुळे काही चुली नष्ट झाल्या, तर काहींच्या चुली असुन सुद्धा पेटवू शकत नाहीत. त्यामुळे अन्नाच्या पाकीटावर दिवस काढावे लागत आहे. या भागात नुकसान झालेल्या पुरग्रस्त बांधवांचे सरकारी पातळीवरून सर्वेक्षण पुर्ण झाले, परंतू सरकार केवढी मदत देतो आणि ती मदत कधी मिळणार या विचारात सद्या नुकसानग्रस्त नागरिक आहेत.

भटवाडी अडवई येथे जमीनदोस्त झालेल्या सावईकर यांच्या घराची पाहणी करताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे व इतर
Goa: तूर्तास शेजाऱ्यांनी दिला आसरा, पुढे काय?

दरम्यान आज सकाळी उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी भटवाडी अडवई येथिल सावईकर कुटुंबाच्या पडलेल्या घराची पाहणी करून, त्या कुटुंबाला मदत करण्या संबंधी दिलासा दिला आहे. त्यापुर्वी आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या वाळपई येथिल कार्यालयात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत उपजिल्हाधिकारी, मामलेदार तसेच तालुक्यातील सर्व सरपंच, पंच व जिल्हा पंचायत सदस्य यांच्या समवेत बैठक घेऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com