घोरपड शिकार प्रकरणी वन अधिकाऱ्यांकडून सहा जणांना अटक; मास, हत्यारे सह दुचाकी जप्त

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

गेल्या आठवड्यात घोरपडीच्या तस्करप्रकरणो वन खात्याने कारवाई करून पाच घोरपडीसह संशयितांना अटक केली होती.

पणजी: कुळे व फोंडा वन अधिकाऱ्यानी संयुकपणे धारबांदोडा येथील तोतोडी गावात छापा घालून सरकारी वनक्षेगात घोरपडीच्या शिकार प्रकरणी सदा गावकर, गीतेश गावकर, भानुदास गावडो, राजेश्वर गावकर, सुरेश गावकर व मधू गावडो या सर्वाना अटक केली. त्यांच्याकडून ९ किलो घोरपडीचे मांस व हत्यारे तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी जप्त केली आहे. 

पुढील तपास सुरु आहे. गेल्या आठवड्यात घोरपडीच्या तस्करप्रकरणो वन खात्याने कारवाई करून पाच घोरपडीसह संशयितांना अटक केली होती.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या