गोवा: माजी मुख्यमंत्री रवी नाईक मणिपाल इस्पितळात दाखल

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 1 एप्रिल 2021

फोंड्याचे आमदार आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना तातडीने दोनापावल येथील मणिपाल इस्पितळात दाखल करावे लागले आहे.

पणजी: फोंड्याचे आमदार आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना तातडीने दोनापावल येथील मणिपाल इस्पितळात दाखल करावे लागले आहे.त्यांना ब्रेन स्ट्रोक असा सौम्य धक्का बसला आहे यामुळे त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे. त्यांना तातडीने मणिपाल इस्पितळात हलवण्यात आले आहे त्यांच्यावर आता उपचार सुरू असून पुढील दोन दिवस त्यांना देख रेखी खाली इस्पितळाचा ठेवण्यात येणार असल्याची माहिती इस्पितळाच्या सूत्रांनी दिली. (Goa Former Chief Minister Ravi Naik admitted to Manipal Hospital)

पणजी स्मार्ट सिटी: श्रीनेत कोठवाळे यांची केलेली बदली सरकारने स्थगित केली

यापूर्वी रवी नाईक यांना कोरोनाची लागण झाली होती त्यातून ते बरे झाले होते. दोन दिवसांपूर्वी तहकूब  करण्यात आलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व दिवस रवी नाईक कामकाजात सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या