माजी उपसभापती सायमन डिसोझा यांचे निधन

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

सायमन डिसोझा यांच्‍या निधनाबद्दल राज्यातील अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे. सायमन डिसोझा हे १९८४ मध्ये दाबोळी मतदारसंघातून, तर १९८९ साली ते वास्को मतदारसंघातून आमदार बनले.

दाबोळी: विधानसभेचे माजी उपसभापती तथा काँग्रेस नेते सायमन डिसोझा (८२ वर्षे) यांचे बुधवारी (ता.२३) पहाटे गोमेकॉत उपचार सुरू असताना निधन झाले. वास्कोच्या सेंट ॲण्‍ड्र्यू दफनभूमीत गुरुवारी (ता.२४) त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येतील. त्यांच्या पश्‍चात पत्नी, चार मुली व एक मुलगा असा परिवार आहे. 

डिसोझा यांच्‍या निधनाबद्दल राज्यातील अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे. सायमन डिसोझा हे १९८४ मध्ये दाबोळी मतदारसंघातून, तर १९८९ साली ते वास्को मतदारसंघातून आमदार बनले. १९७६ साली ते बोगदा भागातून मुरगावचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. सायमन त्यांची पत्नी फेलिसिटी डिसोझा यांनीही मुरगाव नगरपालिकेत नगरसेवक पद भूषविले होते. 

सायमन डिसोझा यांनी सॉलिसिटरपदही भूषविले होते.
दाबोळी: सायमन डिसोझा यांनी उपसभापती असताना नवेवाडे भागात दोन पाण्याच्या टाक्या बांधण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. वास्को टिळक मैदानाची पायाभरणी त्यांच्या कारकिर्दीत करण्यात आली होती. तसेच त्यांनी वास्को नगरनियोजन विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद भूषविले होते. राज्याचे सॉलिसिटर जनरलपदसुद्धा त्‍यांनी भूषविलेले आहे. त्यांनी विधानसभेत सभापतीपद म्हणून काम पाहिले होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या