Goa: माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती

आर्लेकर यांचे घराणे मुळापासून संघाचे आहे. त्यांचे वडील विश्वनाथ आर्लेकर यांनी व त्यांनी आणीबाणी काळात कारावासही भोगला आहे.
Goa: माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती
गोव्याचे माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती होणार आहे.Dainik Gomantak

पणजी: गोवा (Goa) विधानसभेचे माजी सभापती (Former Speaker of the Legislative Assembly) व गोव्याचे माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar) (वय ६७) यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले असे आर्लेकर यांनी म्हटले आहे.

आर्लेकर यांचे घराणे मुळापासून संघाचे आहे. त्यांचे वडील विश्वनाथ आर्लेकर यांनी व त्यांनी आणीबाणी काळात कारावासही भोगला आहे. आर्लेकर हे सुरुवातीला वास्को व नंतर पेडणे मतदारसंघातून गोवा विधानसभेत निवडून आले होते. त्यांनी सभापती व पंचायत मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.

गोव्याचे माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती होणार आहे.
Goa: लाडली लक्ष्मी’ स्वीकृतीपत्रांसाठी कार्यालयात तोबा गर्दी

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com