गोवा फाॅरवर्डच्या कार्यकर्त्याला कुख्यात गुंड अन्वर शेखकडून धमकी 

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 11 मार्च 2021

मडगावच्या प्रभाग 6 मध्ये प्रचार सुरु असताना सराईत गुन्हेगार अन्वर शेख याने गोवा फाॅरवर्डचे कायर्कर्ते सायमन फुर्तादो यांना धमकी देण्याचा प्रकार घडला आहे. भाजप नेत्यांच्या बळावरच अन्वर याने ही धमकी दिल्याचा आरोप गोवा फाॅरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष दुर्दासा कामत यांनी केला आहे.

मडगाव  :  मडगावच्या प्रभाग 6 मध्ये प्रचार सुरु असताना सराईत गुन्हेगार अन्वर शेख याने गोवा फाॅरवर्डचे कायर्कर्ते सायमन फुर्तादो यांना धमकी देण्याचा प्रकार घडला आहे. भाजप नेत्यांच्या बळावरच अन्वर याने ही धमकी दिल्याचा आरोप गोवा फाॅरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष दुर्दासा कामत यांनी केला असून गोवा फाॅरवर्डचे उमेदवार, कार्यकर्ते व त्यांच्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. 

महाशिवरात्री 2021: गोव्यातील देवस्थानांमध्ये अशा पद्धतीने साजरी होणार महाशिवरात्री

प्रभाग 6 मध्ये रात्री कोपरा बैठक संपवून गोवा फाॅरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई निघून गेल्यानंतर अन्वर याने बैठकीच्या ठिकाणी येऊन फुर्तोदो यांना धमकी दिली. विजय सरदेसाईच्या जिवावर उडतोस काय, पाय मोडून टाकेन अशी धमकी अन्वर याने दिली. भाजप नेत्यांचा पाठिंबा असल्याशिवाय असा प्रसंग घडू शकत नाही,  असे कामत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

गोव्यात बँका सलग चार दिवस बंद; बँकांच्या खासगीकरणाला विरोध

लबाडी करूनही निवडणूक जिंकता येऊ शकत नाही, हे उमगल्यामुळे भाजप आता गुंडगिरीकडे वळला आहे. असल्या प्रकारांना गोवा फाॅरवर्ड भीक घालत नाही. पण, अशा प्रकारांची पुनरावृत्ती झाल्यास त्याची भाजप व मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्यावर जबाबदारी असेल, असे कामत यांनी सांगितले. अन्वर याने काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर टाकलेल्या व्हिडियोत भाजपचे नेते दामू नाईक यांची प्रशंसा करत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे भाजप नेत्यांचा पाठिंबा असल्याशिवाय अन्वर असा प्रकार करू धजणार नाही, असेही कामत यांनी सागितले. 

संबंधित बातम्या