गोव्यातील संजीवनी साखर कारखाना प्रकरणावरून सभागृहात गदारोळ

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मार्च 2021

गोव्यातील संजीवनी साखर कारखाना संदर्भात आज विधानसभेत चर्चा सुरू झाली. ही चर्चा अर्धा तासाहून अधिक वेळ सुरू असताना सभापतीनी विरोधकांना या प्रश्नावर चर्चा अधिक वेळ देऊ शकत नाही

पणजी: गोव्यातील संजीवनी साखर कारखाना संदर्भात आज विधानसभेत चर्चा सुरू झाली. ही चर्चा अर्धा तासाहून अधिक वेळ सुरू असताना सभापतीनी विरोधकांना या प्रश्नावर चर्चा अधिक वेळ देऊ शकत नाही असे सांगितल्यावर  विरोधकांनी सभापतीसमोरील हौद्यात धाव घेतली त्यामुळे सभापतीनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. पुन्हा हे कामकाज सुरु झाले तेव्हा विरोधकांनी पुन्हा या विषयावर चर्चा करण्यास वेळ देण्याची मागणी केली त्यामुळे सभागृहाचे कामकाज पुन्हा सभापतीनी साडेबारापर्यंत तहकूब केले.

महिला काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांचा राजीनामा; आपमध्ये करणार प्रवेश 

गेल्या चार वर्षापासून संजीवनी साखर कारखाना बंद असून तो सुरू करण्यासाठी सरकारकडून कोणतेच प्रयत्न होत नाहीत असा आरोप गोवा फॉरवर्ड चे आमदार विजय सरदेसाई यांनी केला. मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी या विषयावर बोलण्यास आपल्याला परवानगी द्यावी  यासाठी मोठमोठ्याने आवाज केला. या प्रश्नावर विधानसभेत अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा झाली असल्याने आता आणखी कोणालाही बोलण्यास परवानगी मिळणार नाही असे सभापतीनी स्पष्ट केले त्यामुळे सभागृहात गदारोळ माजला.

गोवा दिल्लीच्याही पुढे; गोव्यातील तरुण नाही, तर मुलंही दारू पिऊ शकतात! 

संबंधित बातम्या